बँकांची कामे(Bank Work) वेळीच उरकून घ्या. कारण येत्या १७ दिवसांमध्ये बँकेच्या शाखा(Bank Closed) वेगवेगळ्या शहरांमध्ये ६ दिवस बंद राहतील. या काळात बँकिंग सेवा ऑनलाईन माध्यमातून चालू राहतील.
मे महिन्यात एकूण १२ दिवसांसाठी बँक बंद राहतील. यापैकी काही सुट्ट्यांचा समावेश आहे. यातले ६ दिवस आधीच होऊन गेले आहेत. मे च्या उर्वरित १७ दिवसांमध्ये बँका ६ दिवस बंद राहतील. १४ मे,१६मे,२२ मे,२३मे,२६मे, ३०मे या ६ दिवशी बँंका बंद असतील.
[read_also content=”सोनं खरेदीचा विचार करताय ? जाणून घ्या आजचा भाव https://www.navarashtra.com/latest-news/gold-and-silver-prize-on-13th-may-2021-nrsr-128322.html”]
यापैकी काही बँक शाखा स्थानिक कारणांमुळे बंद राहतील. १४ मे रोजी भगवान श्री परशुराम जयंती, रमजान ईद, बसवा जयंती, अक्षय तृतीया उत्सव आहे. बेलमपूर, जम्मू, कोची, मुंबई, नागपूर, श्रीनगर, तिरुअनंतपुरम मधील बँक शाखा या दिवशी बंद राहतील.
याशिवाय रविवारी १६ मे आणि २३ मे रोजी आणि २२ मे रोजी महिन्याच्या चौथ्या शनिवारी सर्वत्र बँकाच्या शाखा बंद ठेवल्या जातील. बुद्ध पौर्णिमा २६ मे रोजी आहे. या दिवशी अगरताळा, बेलापूर, भोपाळ, चंदीगड, डेहराडून, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनऊ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, रामपूर, रांची, शिमला आणि श्रीनगर येथे बँकेच्या शाखा बंद राहतील.तसेच ३० मे रोजी रविवारी सर्वत्र बँका बंद असतील.