मुंबई : [blurb content=””]जर्मनी-रशिया-युक्रेन-यूएसए या देशांमध्ये सुरु असलेल्या युध्दावर अभिनेता अर्शद वारसीने मीम्स तयार करून सोशल मीडियावर शेअर केलं होतं पण हे मीम्स अर्शदला चांगलंच महागात पडलं आहे. कारण आता या मीम्सवरून अर्शदला नेटक-यांनी ट्रोल केलं आहे.
अर्शदने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून हे मीम शेअर केले होते. रोहित शेट्टी दिग्दर्शित गोलमाल या चित्रपटावरं असलेलं हे मीम आहे. हे मीम शेअर करत जर्मनी-रुस-यूक्रेन-अमेरिका-फ्रान्स या देशांची परिस्थिती दाखवली आहे. या मीममध्ये त्याने शर्मन जोशीला अमेरिका, स्वत: युक्रेन, अजय देवगण जर्मनी, तुषार कपूर फ्रान्स आणि गुंड हे रशिया असल्याचे दाखवले आहे. गोलमालचा एक सीन मीममध्ये दाखवला आहे जिथे रिमीला पाहता पाहता गुंडांसमोर अडकतो आणि बाकी सगळे पळून जातात. यात अजय देवगण आणि शर्मन जोशी हे देखील त्याच्यासोबत आहेत. पण जसं समोर त्यांना गुंड दिसतात आणि ते आता कर्ज मागणार हे त्यांच्या लक्षात येतं ते पळून जातात, पण अर्शद गुंडांच्या जाळ्यात अडकतो, असे त्या मीममध्ये दाखवण्यात आले होते.
त्याचे हे मीम पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. एक नेटकरी म्हणाला, “मला विनोद कळला… संदर्भ बरोबर आहे..पण अशा परिस्थितीत असे विनोद करायला नको. तिथे कुठेतरी युद्ध सुरु आहे.” दुसरा नेटकरी म्हणाला, “मूर्खपणाची हद्द पार झाली आहे. संकटाच्या परिस्थितीत कोणीतरी अशा गोष्टीचा विचार किंवा सोशल मीडियावर शेअर कसं करू शकतं?” तिसरा नेटकरी म्हणाला, “युक्रेनमध्ये लोकांना त्रास होत आहे आणि तुम्ही त्यातून एक मीम बनवलं. तुमच्याकडून ही अपेक्षा केली नव्हती.” आणखी एक नेटकरी ट्रोल करत म्हणाला, “लोक मरत आहेत आणि तुम्ही विनोद करत आहात”, अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी अर्शदला ट्रोल केले आहे.
Sorry to say, but not expected, this from you, this is not funny at all, there are so many innocent lives in danger we should pray for them rather than make funny memes on them very disappointed.? https://t.co/nJDJktI7zO
— A I J A Z ऐजाज़??❤ (@Beingaijaz7) February 24, 2022
I get the comedy… the references but again this is no drill.. this is real time. There’s a war going on somewhere out there
— Dey (@RdDey) February 24, 2022