ऑलिम्पिकमध्ये भारताचा सुवर्ण इतिहास लिहणाऱ्या नीरज चोप्राचं ब्रेड -ऑम्लेट आहे फेवरेट फूड, पाणीपुरीलाही देतो खास पसंती

नीरज चोप्राने(Neeraj Chopra) भालाफेक(Javelin Throw)  या क्रीडाप्रकारात ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक(India Won Gold Medal) मिळवले आहे. भारताला तेरा वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये (Olympic 2020)सुवर्णपदक मिळाले आहे.
neeraj chopra
Published on: 
Updated on: 

भारताने शंभरपेक्षा जास्त वर्षानंतर ॲथलेटीक्समध्ये(Athletics) मोठी कामगिरी केली आहे. नीरज चोप्राने(Neeraj Chopra) भालाफेक(Javelin Throw)  या क्रीडाप्रकारात ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक(India Won Gold Medal) मिळवले आहे. भारताला तेरा वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये (Olympic 2020)सुवर्णपदक मिळाले आहे.याआधी 2008 मध्ये अभिनव बिंद्राने ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकलं होतं.

देशातील लोकांना क्रीडापटूचा आहार(Diet) काय असतो हे जाणून घेण्यात कायम उत्सुकता असते. भारताला सुवर्णपदक मिळवून देणारा नीरज ब्रेड ऑम्लेट खाणं नेहमी पसंत करतो. ब्रेड ऑम्लेट हे त्याचं फेवरेट फूड आहे. कोणत्या स्पर्धेत जिंकल्यानंतर तो गोड खातो. नीरजच्या मते पाणीपुरीने क्रीडापटूंचे कोणतेही नुकसान होत नाही त्यामुळे नीरज पाणीपुरीही खातो.

नीरजच्या आवडीचे पदार्थ

  • कोणत्याही क्षणी ब्रेड - ऑम्लेट खाणं नीरजला आवडतं.
  • नीरज भातदेखील खातो.
  • टुर्नामेंटच्या दरम्यान सॅलड आणि फळ खाणे याला नीरज प्राधान्य देतो.
  • टुर्नामेंट ज्या देशात असेल तिथलं जेवण नीरज खातो.
  • इतर देशांच्या खेळाडूंना नीरज भारतीय पदार्थांपैकी चिकन करी किंवा बटर चिकन खाण्याचा सल्ला देतो.
  • जिंकल्यानंतर बक्षीस म्हणून नीरज गोड खातो. इतर वेळी नीरज गोड खात नाही. आपल्या आहारात नीरजने सॉलमन फिशचा नुकताच समावेश केला आहे. सरावा दरम्यान नीरज फ्रूट ज्यूस पितो.
  • फास्ट फूडमध्ये नीरजला पाणीपुरी खूप आवडते. पाणीपुरीमध्ये जास्त पाणी असल्यामुळे हे खाण्यात काही गैर नाही, असे नीरज मानतो.