
जपानची राजकुमारी माकोने आपल्या प्रेमापोटी शाही घराण्याला नकार दिला आहे. त्यांनी केई कोमुरो नावाच्या व्यक्तीसोबत लग्न ठरवलं आहे. तसेच केई कोमुरो हा व्यक्ती माको यांचा बॉयफ्रेंड आहे. या लग्नानंतर माको जपानच्या राजकुमारी राहणार नाहीयेत. जपानमध्ये कोणत्याही सामान्य व्यक्तींसोबत लग्न केल्यानंतर त्यांच्या राजघराण्यातलं साम्राज्य संपुष्टात येतं. माकोने हे सुद्धा सांगितलं की, जर त्यांना आमच्या लग्नाबाबत काही त्रास झाला असेल तर मी त्यांची माफी मागते.