kabir khan
रणवीर सिंहचा (Ranveer Singh) ‘83’ (83 Movie) हा चित्रपट २४ डिसेंबरला चित्रपटगृहांमध्ये रिलीज झाला. मात्र आता ‘83’ या चित्रपटाचे दिग्दर्शक कबीर खान हा चित्रपट ओटीटीवर रिलीज करण्याच्या विचारात आहेत. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी हा खुलासा केला आहे. खरंतर ‘83’ हा चित्रपट चित्रपटगृहामध्ये रिलीज होण्यापूर्वी ओटीटीवर रिलीज (83 Movie On OTT) करण्याची ऑफर आली होती. मात्र कबीर खान (Kabir Khan) यांना ‘83’ हा चित्रपटगृहातच रिलीज करायचा होता. हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर फारशी कमाई करु शकला नाही. कोरोनामुळे दिल्ली शहरात तर चित्रपटगृहेच बंद करण्यात आली.
एका मुलाखतीत कबीर खान यांनी सांगितले की, १८ महिन्यांपूर्वीच हा चित्रपट तयार झाला होता. लोकांनी मोठ्या पडद्यावर या चित्रपटाचा आनंद घ्यावा या उद्देशानेच हा चित्रपट तयार करण्यात आला होता. मात्र चित्रपट रिलीज करण्यासाठी वाट बघावी लागली. मात्र कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने दिल्लीतील सिनेमाहॉल बंद करण्यात आले. ”
[read_also content=”….. तर राज्यात होऊ शकतो लॉकडाऊन, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा https://www.navarashtra.com/latest-news/paschim-maharashtra/satara/deputy-chief-minister-ajit-pawar-warning-about-lockdown-nrsr-217682.html”]
कबीर खान यांनी सांगितलं की, हा चित्रपट कपिल देव यांच्या आयुष्यावर आधारित आहे. त्यांनी आम्हाला दिलासा दिला. ते म्हणाले होते की जेव्हा आम्ही वर्ल्ड कप जिंकला तेव्हा आम्हाला पैसे नाही मिळाले. पण आम्हाला सन्मान मिळाला होता. तुम्ही हा चित्रपट सन्मान मिळवण्यासाठी बनवली आहे आणि तो सन्मान तुम्हाला मिळत आहे. तुम्ही त्याच्यावर फोकस करा.
कबीर म्हणाले की, चित्रपट चित्रपटगृहात दाखवणे कधी बंद करावे लागेल हे आम्हाला माहिती नाही. जर नियम आणखी कडक झाले तर हा चित्रपट आम्ही ओटीटीवर रिलीज करणार आहोत. मात्र लोक योग्य ती काळजी घेऊन थिएटरमध्ये जात आहेत, या गोष्टीचा आम्हाला आनंद आहे.