मुंबई- शुक्रवारी रात्री बीटाऊनमध्ये घडलेल्या एका घटनेने एकच खळबळ उडाली आहे. सैफ अली खानचा (saif ali khan) मुलगा इब्राहिम अली खान (ibrahim ali khan) आणि अभिनेत्री श्वेता तिवारीची (shweta tiwari) मुलगी पलक तिवारी (palak tiwari) यांची डिनर डेट मीडियापासून काही लपली नाही. हे दोघे डिनरला एकत्र गेले होते. डिनर झाल्यानंतर एकाच गाडीमधून जात असताना मीडियाच्या नजरेतून हे दोघे काही सुटले नाहीत.
दोघं गाडीत बसत असताना लगेच एकच कॅमेराचा लखलखाट झाला. कॅमेराचा फ्लॅश पाहून लगेचच पलकने आपला चेहरा झाकला. पलकची ही अवस्था पाहून इब्राहिमला काही हसू आवरेना. इब्राहिम गालातल्या गालात हसू लागला. या दोघांचे फोटो आणि व्हि़डिओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होतायत.
या दोघांची ही अवस्था पाहून ‘दो दिल मिल रहे है मगर छुपके छपके’ असंच म्हणावंस वाटतंय .