परिणीती-राघव : बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख नेते राघव चढ्ढा लवकरच लग्नबंधनात अडकरणार आहेत. काही महिन्या आधी परिणीती आणि राघव या दोघांचा साखरपुडा पार पडला. साखरपुडा झाल्यानंतर या दोघांच्या लग्नाची तारीख आणि स्थळ याविषयी चर्चा सोशल मीडियावर रंगल्या होत्या, परंतु आता या चर्चाना पूर्णविराम मिळाला आहे. या दोघांच्या साखपुड्याला बॉलीवूड सेलिब्रेटींपेक्षा राजकीय क्षेत्रामधील कार्यकर्त्यांची जास्त गर्दी केली होती. काँग्रेसचे प्रमुख नेते राहुल गांधी यांनी देखील उपस्थिती लावल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
साखरपुडा पार पडल्यानंतर परिणीती आणि राघव चढ्ढा यांना नेटकऱ्यांनी लग्नाच्या तारखेवरुन प्रश्न विचारुन भंडावून सोडले होते. आता या दोघांच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. या पत्रिकेवरून या दोघांचे चाहते कौतुकाचा वर्षांव करत आहेत. साखरपुड्याच्या वेळी परिणीतीची बहिण हॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री प्रियंका चोप्रा अमेरिकेतून आली होती. यावेळी तिचा पती निक जोनास देखील हजर होता. आता परिणीतीच्या लग्नाच्या पत्रिकेनं नेटकऱ्यांच्या मनातील प्रश्नांची उत्तरं देऊन टाकली आहेत. त्यात लग्न केव्हा, कुठे आणि किती वाजता आहे हे सांगून टाकलं आहे.
राघव चढ्ढा आणि परिणीती चोप्रा हे दोघे येत्या ३० सप्टेंबर रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत. हे दोघे चंदीगडमधील ग्रँड ताज हॉटेलमध्ये त्यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे. आम्ही चढ्ढा कुटूंबीय आपल्या सर्वांना त्या ग्रँड वेडिंगसाठी निमंत्रित करतो आहोत. आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. प्री वेडिंग कार्यक्रम हे २३ डिसेंबर रोजी होणार आहे. २४ डिसेंबर रोजी ते राजस्थानमधील उदयपूरमधील लीला पॅलेसमध्ये लग्न करणार असल्याचे बोलले जात आहे. राजस्थानमध्ये २३ आणि २४ डिसेंबर रोजी पंजाबी रीतिरिवाजानुसार लग्न करणार असल्याचे सांगण्यात आले आ