पेटीएमला मोठा दिलासा..! नवीन युपीआय वापरकर्ते जोडण्यासाठी एनपीसीआयकडून मान्यता!
Paytm Layoffs : वन 97 कम्युनिकेशनन्स अर्थात पेटीएम या देशातील नामाकिंत ई-कॉमर्स कंपनीकडून पुन्हा एकदा मोठी नोकर (paytm layoffs) कपात करण्यात आली आहे. ज्यामुळे आता जानेवारी ते मार्च 2024 या त्रेमासिक कालावधीत Paytm च्या सेल्स विभागातील कर्मचाऱ्यांची संख्या जवळपास 3,500 ने घटून, सध्याच्या घडीला केवळ 36,521 इतकी राहिली आहे. आरबीआयकडून पेटीएम पेमेंट्स बँकेच्या सर्व्हिसेसवर प्रतिबंध घालण्यात आल्याने, हा निर्णय घेण्यात (paytm layoffs) आल्याचे सांगितले जात आहे.
मार्चपासून सेवा बंद Paytm Layoffs
भारतीय रिझर्व्ह बँकेने व्यापार विश्वासह ग्राहकांच्या हिताच्या रक्षणासाठी पेमेंट्स बँकेच्या सर्व्हिसेसवर प्रतिबंध घातला आहे. ज्यामुळे पेटीएमच्या कोणत्याही ग्राहकांचे खाते, वॉलेट आणि फास्टैगमध्ये जमा रक्कम, क्रेडिटच्या देवाणघेवाणीसह टॉप-अप स्वीकारण्यास 15 मार्च 2024 पासून पूर्णतः प्रतिबंध घालण्यात आला आहे. परिणामी, कंपनीला मोठा घाटा सहन करावा लागला असून, आर्थिक वर्ष 2023-24 मधील शेवटच्या तिमाहीत अर्थात जानेवारी ते मार्च या कालावधीत कंपनीला जवळपास 550 कोटींचा फटका सहन करावा लागला आहे.
काय म्हटले आहे कंपनीने आपल्या निवेदनात?
कंपनीने आपल्या १० जून अर्थात सोमवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “कंपनीच्या पुनर्रचना धोरणानुसार आपल्या नोकरीचा राजीनामा देणाऱ्या वन 97 कम्युनिकेशनन्सकडून आपल्या कर्मचाऱ्यांना रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी कंपनीकडून प्रयत्न केले जात आहे. ज्यानुसार सध्या ज्या कंपन्या नोकर भरती करत आहे, अशा ३० हून अधिक कंपन्यासोबत वन 97 कम्युनिकेशनन्स सक्रियरित्या संपर्कात आहे.” दरम्यान कंपनीला यावर्षीच्या कंपनीला 550 कोटींचा तोटा सहन करावा लागला आहे. जो मागील वर्षीच्या याच कालावधीत 167.5 कोटी रुपये इतका नोंदवला गेला आहे.