...तब्बल 50 हजार कर्मचाऱ्यांना 10 दिवसांची पगारी सुट्टी; 'या' नामांकित कंपनीच्या निर्णयाची सर्वदूर चर्चा!
तुम्हीही रोज-रोज ऑफिसला जाऊन कंटाळला आहात का? असा प्रश्न विचारल्यास आपल्यापैकी बरेच जण होकारार्थी उत्तर देतील. त्याच-त्याच दैनिक कामकाजामुळे अनेक जण वैतागलेले असतात. अशातच कंपनीकडून तुम्हाला १० दिवसांची पगारी सुट्टी मिळाली तर? तुमच्या आनंदाला पारावार उरणार नाही. मात्र, असाच काहीसा प्रकार आता सुरत येथील कंपनीमध्ये घडला आहे. कंपनीने आपल्या 50000 कर्मचाऱ्यांना १० दिवस पगारी सुट्टी दिली आहे. मात्र, ही १० दिवसांची सुट्टी कर्मचाऱ्यांचे टेन्शन वाढणारी आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
सुरत येथील एका डायमंड निर्माता कंपनीने एक असे पाऊल उचलेले आहे. ज्याची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. कंपनीने आपल्या 50 हजार कर्मचाऱ्यांना एकत्रितपणे १० दिवसांची सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १७ ऑगस्टपासून २७ ऑगस्टपर्यंत ही सुट्टी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. मात्र, ही सक्तीची रजा कर्मचाऱ्यांच्या चिंतेत वाढ करणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात पॉलिश्ड हिऱ्यांची मागणी कमी झाल्यामुळे हे पाऊल उचलावे लागल्याचे कंपनीने म्हटले आहे.
हेही वाचा : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण; गुंतवणूकदारांचे 1.57 लाख कोटींचे नुकसान!
काय म्हटलंय नेमकं कंपनीने?
सुरत येथील किरण जेम्स कंपनी ही जगातील सर्वात मोठी नैसर्गिक हिरा उत्पादक कंपनी आहे. कंपनीचे अध्यक्ष वल्लभभाई लखानी यांनी याबाबत माहिती जारी केली आहे की, “कंपनीकडून आपल्या कर्मचाऱ्यांना 10 दिवसांच्या रजेवर पाठवले जाणार आहे. या १० दिवसांच्या कालावधीतील पगार देखील सर्व कामगारांना दिला जाईल. मात्र, यात कंपनीची अल्प कपात केली जाईल. जागतिक हिरे बाजारातील मंदीमुळे कंपनीला हा निर्णय घ्यावा लागत आहे.”
हेही वाचा : शेअर बाजारात आपटी, अन् एकाच दिवसात अंबानी-अदानी यांचे हजारो कोटींचे नुकसान!
रशिया-युक्रेन, इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धांमुळे फटका
दरम्यान, सुरत डायमंड असोसिएशनचे अध्यक्ष जगदीश खुंट यांनी हिरे बाजारातील मंदीबाबत बोलताना म्हटले आहे की, जगातील एकूण हिऱ्यांच्या मागणीपैकी 90 टक्के हिऱ्यांवर सुरत येथे प्रक्रिया केली जाते. किरण जेम्ससारख्या मोठ्या कंपनीने पहिल्यांदाच अशा पद्धतीने आपल्या कामगारांना सक्तीची सुट्टी देण्याचे कठोर पाऊल उचलले आहे. रशिया-युक्रेन आणि इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धांमुळे कंपनीला मागील काही काळात नुकसान सोसावे लागले आहे. सुरतमधील हिरे उद्योगाची उलाढाल 2 वर्षात 2.25 लाख कोटी रुपयांवरून, 1.50 लाख कोटी रुपयांपर्यंत खाली आली आहे.