सुयोग वाघ विजेता (फोटो- सोशल मिडिया)
शिवभूमी आंतरराष्ट्रीय खुल्या फिडे ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धा
महाराष्ट्राच्या सुयोग वाघने पटकावले विजेतेपद
कात्रज येथील आरोह गार्डन मंगल कार्यालय येथे पार पडली स्पर्धा
पुणे/Chess: शिवभूमी शिक्षण ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित शिवभूमी आंतरराष्ट्रीय खुल्या फिडे ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेत महाराष्ट्राच्या सुयोग वाघ याने विजेतेपद पटकावले. कात्रज येथील आरोह गार्डन मंगल कार्यालय येथे पार पडलेल्या या स्पर्धेत नवव्या फेरीत पहिल्या पटावरील लढतीत सुयोग वाघने अविरत चौहानला बरोबरीत रोखत ८ गुण, ५५ बुकोल्स कट गुणसरासरीच्या जोरावर प्रथम क्रमांक पटकावला. अक्षय बोरगावकरने मिहीर सरवदेचा पराभव करून ८ गुण ५४.५ बुकोल्स कट गुण सरासरीच्या जोरावर दुसरा क्रमांक पटकावला. विरेश शरणार्थीने श्लोक शरणार्थीवर विजय मिळवत ८ गुण, ५१.५ बुकोल्स कट गुण सरासरीच्या जोरावर तिसरा क्रमांक पटकावला.
स्पर्धेतील विजेत्या खेळाडूला करंडक व १०,००० रुपये, तर उपपविजेत्या खेळाडूला करंडक व ७,०००रुपये अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक आयएम चंद्रशेखर गोखले, देहूचे मुख्य कार्यकारी अधिकारी चेतन कोंडे, आंतरराष्ट्रीय खेळाडू तेजस देशमुख आणि बीजेपीचे उपाध्यक्ष महेश टापरे यांच्या हस्ते करण्यात आले.
कुठं बी जा, भारताचा नाद करायचा नाय! क्रिशव शाहची मलेशियात उत्तुंग भरारी, Chess स्पर्धेत…
यावेळी संतोष कोळी, आदित्य जगताप, विवेक भागवत, नागनाथ हळकुडे, सुनील घोडेराव, सॅनटन डिसुझा, शिवभूमी शिक्षण ट्रस्टचे संचालक, स्पर्धा संचालक व एमसीएचे उपाध्यक्ष राजेंद्र कोंडे, चीफ आरबीटर आयए राजेंद्र शिदोरे आणि डेप्युटी चीफ आरबीटर आयए श्रद्धा विंचवेकर, संग्राम कोंडे आदी उपस्थित होते.
सुयोग वाघ (८गुण)बरोबरी वि.अविरत चौहान(७.५गुण);
मिहीर सरवदे(७गुण)पराभूत वि.अक्षय बोरगावकर८गुण);
श्लोक शरणार्थी(७गुण)पराभूत वि.विरेश शरणार्थी(८गुण);
कशिश जैन(७.५गुण)बरोबरी वि. सिद्धांत साळुंखे(७.५गुण);
श्रावणी उंडाळे(६.५गुण)पराभूत वि.निखिल दिक्षित(७.५गुण);
प्रणव बुर्ली(६.५गुण)पराभूत वि.प्रियांशु पाटील(७.५गुण);
शंकर साळुंके(६गुण)पराभूत वि.कुशाग्र जैन(७गुण);
श्रेयस हापसे(६गुण)पराभूत वि.संकर्षण शेळके(७गुण);
उत्कर्ष भिलवाडे(७गुण)वि.वि.अखिलेश नागरे(६गुण)
Chess च्या विश्वात भारताचा तिरंगा उंचावला! सलग तिसऱ्यांदा पटकावला मानाचा करंडक, उझबेकिस्तानमध्ये…
अचितांगा कश्यप(आसाम)(६गुण)पराभूत वि.सौरभ म्हामणे(७गुण);
निर्गुण केवल (७गुण)वि.वि.राहुल कदम(६गुण);
कमलनयन देशमुख(६गुण)पराभूत वि. ओम लामकाने(७गुण);
राघव पावडे(६गुण)पराभूत वि.आदित्य जोशी(७गुण);
शंकर स्वराज(६गुण) पराभूत वि.प्रथमेश धर्माधिकारी(७गुण);
संतोष गायकवाड(६गुण)पराभूत वि.अभिजीत बिलपे(७गुण).






