‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेली अनेक वर्ष प्रेक्षकांच मनोरंजन करतय. या शोमधील प्रत्येक पात्राने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलय. या शोमधील प्रत्येक कलाकाराबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते कायमच उत्सुक असतात. यातीलच एक महत्त्वाचं पात्र म्हणजे पत्रकार पोपटलाल. अभिनेता श्याम पाठक पोपटलाल ही महत्वाची भूमिका साकारत आहे.
पण ‘तारक मेहता… ‘या शोमध्ये पोपटलालची भूमिका साकारणाऱ्या श्याम पाठकने हॉलिवूड सिनेमातही काम केल्याचं अनेकांना ठाऊक नसेल. खरं तर श्याम पाठक यांनी ‘लस्ट कॉशन’ या एका चायनीज सिनेमात काम केलं असून हा एक रोमॅण्टिक सिनेमा होता. २००७ सालात हा सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमात पोपटलालने म्हणजेच श्याम पाठकने एका दागिन्यांच्या दुकानातील विक्रेत्याची भूमिका साकारली होती. या सिनेमात श्याम पाठकसोबत अभिनेता अनुपम खेर देखील झळकले होते.
तर या व्हिडोतील पोपटलाच इंग्रजी एकूनही तुम्हा अवाक व्हाल. पोपटलालनेच म्हणजेच अभिनेता श्याम पाठकने नुकताच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केलाय. “माझ्या जुन्या कामापैकी एक..जुने दिवस..हॉलिवूड” असं तो कॅप्शनमध्ये म्हणालाय.