बिगबॉस १५ ची विजेती तेजस्वी प्रकाशला सुध्दा बॉडी शेमिंगचा सामना करावा लागतो होता असं जर तुम्हाला कोणी सांगितलं तर खोटं वाटेल. मात्र हे खरं आहे. एका मुलाखतीत तिने अलिकडेच याबाबतचा खुलासा केला.
तेजस्वी प्रकाश म्हणाली की, बॉडी शेमिंग हे फक्त जाड असणाऱ्या व्यक्तींसोबतच होत नाही तर बारीक असणाऱ्या व्यक्तींनाही याचा सामना करावा लागतो. तिने सांगितले की तिच्या कमी वजनामुळे तिला अनेक नकारात्मक कमेंट यायच्या. परफेक्ट दिसण्यासाठी आजकाल अनेकजण सर्जरी करून घेतात याबद्दल तेजस्वीने आपले मत व्यक्त केले आहे. ती म्हणते हा अतिशय सोप्पा मार्ग आहे. पुढे तिने सांगितले की ती खूपच आत्मविश्वासू आहे आणि ती जशी आहे त्याच्या तिला अभिमान आहे. कोणी काहीही म्हणत असेल तरी त्याचा तिला विशेष फरक पडत नाही. तसेच, इतर महिलांना तिने स्वतःवर प्रेम करण्याचा आणि स्वतःमध्ये आत्मविश्वास जागवण्याचा सल्ला आणि आवाहन केले आहे.