दिग्गज अभिनेते दिलीपकुमार काळाच्या पडद्याआड ; ९८वर्षी घेतला अखेरचा श्वास

रुग्णालयात दाखल केल्यापासून असंख्य चाहते व बॉलीवूड कलाकार त्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत होते. दिलीप कुमार यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.
d1c510a7-844b-40da-a6d7-f1286abc9d15
Published on: 
Updated on: 

मुंबई : हिंदी चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेते मोहमद युसूफ खान उर्फ दिलीपकुमार (Tragedy King DilipKumar) यांनी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ते ९८ वर्षांचे होते. दिलीप कुमार यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते उपचारादरम्यान, त्यांनी आज पहाटे अखेरचा श्वास घेतला.

त्यांना रुग्णालयात दाखल केल्यापासून असंख्य चाहते व बॉलीवूड कलाकार त्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत होते. दिलीप कुमार यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.