आयएएस होण्याचं स्वप्न अनेकांचं असतं, पण ते प्रत्यक्षात आणण्यासाठी अफाट कष्ट करावे लागतात. आयएएस अधिकारी झाल्यानंतरही आपल्या कामाचा ठसा निर्माण करावा लागतो. अशाच एका महिला आयएएस अधिकारी, ज्यांच्या नावाचा लौकिक मुंबईतील मेट्रोमुळे घराघरात पोहचलेला आहे, आजच्या महिला दिनानिमित्त आम्ही त्यांच्याशी खास चर्चा केली. २०१५ ते २०२० या ५ वर्षे त्या मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणजेच एमडी या पदावर कार्यरत होत्या. मुंबईसारख्या मोठ्या शहरात मेट्रोचे जाळे विणण्याच्या महत्त्वाकांक्षी कार्यात त्यांचा सहभाग फार मोलाचा आहे.
‘मी शाळेत अगदी दहावीपासूनच या क्षेत्रात येण्याचा विचार करत होते. या क्षेत्राकडे विशेष आकर्षण होतं त्यामुळे शालेय जीवनातच या क्षेत्रात येण्याचा विचार केला होता.’ पुढे त्यांच्या शालेय शिक्षणाविषयी देखील त्यांनी सांगितलं, ‘माझं संपूर्ण शालेय शिक्षण हे मराठी माध्यमातूनच झालं. कोल्हापूर, सांगली, तासगाव अशा अनेक ठिकाणी माझं शिक्षण झालं. माझे वडील हे बँकेत नोकरी करायचे आणि त्यामुळे आम्हाला अनेक ठिकाणी रहावं लागायचं. शालेय शिक्षणानंतर कॉलेज आणि मास्टर्सचं शिक्षण पुण्यातून घेतलं.’
‘आजच्या काळात महिला कोणत्याच क्षेत्रात वर्ज्य नाहीत. अगदी डॉक्टर, इंजीनियर पासून ते सीव्हील इंजीनियरींग, वैमानिक अशा सगळ्याच क्षेत्रात महिला करिअर करताना दिसत आहेत. पण त्यावेळी कल थोडा वेगळा होता. मी आणि माझ्यासारख्या खूप कमी या क्षेत्राची निवड करत होत्या. बहूतेकजणी या डॉक्टर किंवा शैक्षणिक क्षेत्रात सध्या कार्यरत आहेत. काहीजणी शिक्षिका आहेत.’
‘संकटं असं नाही, पण त्या काळी आजच्या इतकं इंटरनेट नव्हतं. माझ्या कुटुंबियांनी मला पूर्ण सपोर्ट केला. त्यांच्याशिवाय मला इथे पोहोचणं शक्य नव्हतं. योगायोगाने माझी भेट माझ्या एका काकांशी झाली त्यांनी मला शाळेत असताना या क्षेत्राची माहिती दिली होती. पण तेव्हा आजच्या इतकं इंटरनेट नव्हतं. मुबलक आभ्यासाचं साहित्य उपलब्ध नव्हतं. महत्त्वाची पुस्तकं किंवा साहित्य हे ठराविक ठिकाणी मुंबई, पुण्यातच उपलब्ध व्हायची. त्यामुळे अभ्यासाठी थोडे जास्त कष्ट घ्यावे लागत होते.’
‘जेव्हा आपण शासकिय कामात असतो तेव्हा आपला जास्तीत जास्त वेळ हा आपल्या कामाला देणं गरजेचं असतं. कामं वेळेत पूर्ण करण हे एक टास्क असतं. निरनिराळ्या कामांच्या जबाबदाऱ्या असतात. त्या पार पाडाव्या लागतात. ताणतणाव देखील असतो.’
‘कुटुंबाचा खूप मोठा वाटा आहे. कुटुंबाचा मला खूप आधार आहे. माझे पती जे निवृत्त आयएएस अधिकारी आहेत, माझ्या सासूबाई, मुलं सगळेच मला नेहमीच सपोर्ट करतात. त्यांच्याशिवाय काम करणं कठीण आहे. कामाच्या जबाबदाऱ्या पार पाडून कुटुंबाकडेही लक्ष देणं हे लक्षात ठेवलं की हे होऊन जातं. अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांमध्ये मला त्यांची मदत होते.’
‘हा प्रश्न माझ्यासाठी फारच कठीण आहे. कारण याशिवाय दुसरा मी जास्त विचार केलाच नाही. या क्षेत्रात येणं हेच माझं धैय होतं. तरीही विचार केलाच तर मी शैक्षणिक क्षेत्रात शिक्षिका वैगरे असते. कारण सुरूवातीला काही महिने मी हे काम केलं होतं. पण शासकिय अधिकारी होणं हेच मी सुरूवातीपासूनच ठरवलं होतं.’
‘जबाबदारी फारच मोठी होती मात्र आधीही पाच वर्षे मी एमएमआरडीए साठी काम केलं होतं. तेव्हाही अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या होत्या त्यामुळे हे कामंही त्याच धाटणीचं होतं. अनेक महत्त्वाची कामं असतात. अनेकदा काही लोक अँक्टीव्हीस्ट काही याचिका दाखल करतात अशा वेळी कामात अडथळा निर्माण होतो. पण हे सगळं सांभाळत काम पूर्ण करावं लागतं.’
‘या क्षेत्रात येताना आधी संपूर्ण विचार करून मगच क्षेत्र निवडा. कामाचा व्यापही लक्षात घेतला पाहिजे. तसेच सुरूवातीपासूनच आभ्यासाची तयारी ठेवायला हवी. जमेल तितकं अभ्यासाच्या साहित्यांचा उपयोग करा.’