Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अंटार्क्टिकामध्ये असलेला जगातील सर्वात मोठा हिमनग तुटला, पर्यावरण अभ्यासक आणि वैज्ञानिकांमध्ये चिंतेचे वातावरण

अंटार्क्टिकामध्ये (Antarctica) बर्फाचा एक भला मोठा हिमनग (Iceberg) तुटून पडू लागला आहे. हा जगातील सर्वात मोठा हिमनग मानला जातो.

  • By साधना
Updated On: May 21, 2021 | 06:28 PM
Antartica iceberg melt

Antartica iceberg melt

Follow Us
Close
Follow Us:

लंडन : जगभरातील पर्यावरणप्रेमी,अभ्यासक आणि वैज्ञानिक यांच्यामध्ये चिंतेचं वातावरण आहे. अंटार्क्टिकामध्ये (Antarctica) बर्फाचा एक भला मोठा हिमनग (Iceberg) तुटून पडू लागला आहे. हा जगातील सर्वात मोठा हिमनग मानला जातो. हा हिमनग १७० किलोमीटर लांब आणि सुमारे २५ किलोमीटर रुंद आहे.

अंटार्क्टिकामधील पश्चिम भागातील रोन्ने आईस सेल्फमध्ये असणारा हा महाकाय हिमनग तुटताना युरोपीय स्पेस एजन्सीच्या  उपग्रहाच्या छायाचित्रांमध्ये दिसून आला आहे. हा हिमनग तुटल्याने जगभरात चिंता पसरली आहे.

[read_also content=”दहावी-बारावीच्या परीक्षेसंदर्भात २-३ दिवसांमध्ये होणार निर्णय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे https://www.navarashtra.com/latest-news/chief-minister-uddhav-thakre-said-tenth-and-twelfth-exam-decision-will-be-taken-in-two-three-days-nrsr-132163.html”]

हा हिमनग तुटल्यानंतर तो वेड्डेल समुद्रात स्वतंत्रपणे तरंगत आहे. या महाकाय हिमनगाचा पूर्ण आकार ४३२० किलोमीटर आहे. हा जगातील सर्वात मोठा हिमनग मानला जात असून त्याला ए-७६ असं नाव देण्यात आलं आहे. हा हिमनग तुटल्याची छायाचित्रे युरोपियन युनियनच्या कोपरनिकस सेंटीनल या उपग्रहाने (Satellite) काढलेली आहेत. हा उपग्रह जमिनीवरील धुव्रीय प्रदेशांवर लक्ष ठेवतो. ब्रिटनच्या अंटार्क्टिक सर्व्हे दलाने सर्वप्रथम हा हिमनग तुटून पडल्याचे जाहीर केले होते.

हा हिमनग तुटल्याने किंवा स्खलन झाल्याने थेट समुद्रातील पाणीपातळी वाढणार नाही. परंतु,अप्रत्यक्षपणे पाणीपातळीत नक्की वाढ होऊ शकते. तसेच यामुळे हिमनगांचा वेग आणि बर्फाचा प्रवाह कमी होऊ शकतो. अंटार्क्टिकातील भूभाग हा पृथ्वीवरील अन्य भुभागांच्या तुलनेत वेगाने तप्त होत असल्याचा इशारा या सेंटरनं दिला आहे. अंटार्क्टिकामध्ये बर्फाच्या स्वरुपात इतके पाणी साठलेले आहे की हा बर्फ जर वितळला तर जगभरातील समुद्रामधील पाणीपातळी (Water Level) २०० फुटांपर्यंत वाढू शकते.

वैज्ञानिकांच्या मते, ए-७६ हा हिमनग हा हवामान बदलामुळे नाही तर नैसर्गिक कारणांमुळे तुटला आहे. ए-७६ आणि ए-७४ हे दोन्ही हिमनग त्यांचा कालावधी संपल्यानं नैसर्गिक कारणांमुळे तुटले आहेत,असे ट्वीट ब्रिटीश अंटार्क्टिक सर्व्हे ग्रुपच्या वैज्ञानिक लॉरा गेरीश यांनी केले आहे.

Web Title: Worlds biggest iceberg melting in antarctica nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2021 | 06:26 PM

Topics:  

  • Iceberg

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.