
मागील संपूर्ण वर्ष लॉकडाऊनच्या सावटाखाली काढल्यानंतर आता हळूहळू सर्वत्र ‘न्यू नॉर्मल’ होऊन जीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे. कार्यालये, सार्वजनिक वाहतूक, हॉटेल्स, मॉल्स सुरु झाल्यानंतर आता सिनेसृष्टीही प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी नव्या जोमाने सज्ज झाली आहे. अनेक नवनवीन चित्रपटांची घोषणा होत असतानाच, हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा’ या चित्रपटाचीही घोषणा करण्यात आली आहे. खरं तर ‘झिम्मा’ नावाचा चित्रपट येत असल्याची आधीपासूनच चर्चा होती मात्र यात कलाकार कोण असणार याची सर्वांना उत्सुकता होती.