उत्तराखंडमधील अनोखे मंदिर, इथे देवाला चिठ्ठी लिहायला दूरदूरवरून येतात भाविक
कुठे आहे हे मंदिर?
उत्तराखंडमधील अल्मोडा या ठिकाणी देवाचे हे अनोखे मंदिर वसले आहे. चिताई गोलू देवता मंदिर असे याचे नाव आहे. हिमालयाचे सुंदर दृष्य, जुने मंदिर आणि शांत वातावरणासाठी अल्मोडा लोकप्रिय आहे. भक्त मंदिर परिसरात घंटा अर्पण करतात आणि त्यावर आपल्या इच्छा लिहिलेल्या चिठ्ठ्या अर्पण करतात. अल्मोडापासून मंदिरापर्यंत जाण्यासाठी तुम्हाला स्थानिक टॅक्सीची मदत घ्यावी लागले. येथील डोंगरांमध्ये सूर्याेदय आणि सूर्यास्ताचे सुंदर दृष्य पाहता येते.
नंदा देवी मंदिर
अल्मोडा शहरात आणखी एक लोकप्रिय देवीचे मंदिर आहे ज्याचे नाव आहे नंदा देवी मंदिर. धार्मिक आणि सांस्कृतिक दोन्हींमध्ये याचे महत्त्व फार आहे. मंदिराची वास्तुकला आणि स्थानिक परंपरा या ठिकाणाला इतर पर्यटन ठिकाणांहून वेगळी बनवते.
एकाच ठिकाणी 124 मंदिरांचा संघ
अल्मोडापासून साधारण ३६ किमी अंतरावर जागेश्वर मंदिर संकुल पाहता येते. उत्तराखंड पर्यटन विभागानुसार, इथे एकाच ठिकाणी तब्बल १२४ मंदिरांचा संघ पाहायला मिळतो. तथापि, भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाने संकुलातील अनेक मंदिरांना संरक्षित स्मारके म्हणून सूचीबद्ध केले आहे.
मुंबईहून अल्मोडा कसे जावे?
यासाठी तुम्ही विमान किंवा रेल्वे मार्गाचा वापर करु शकता. मुंबईहून दिल्लीपर्यंत रस्ते प्रवास खूप लांब आणि थकवणारा ठरेल. विमान प्रवासासाठी मुंबई एअरपोर्टवरुन तुम्ही पंतनगर विमानतळासाठी किंवा दिल्ली विमानतळासाठी फ्लाईट पकडू शकता. आता रेल्वे मार्गासाठी तुम्हाला मुंबईहून उत्तराखंडमधील काठगोदाम रेल्वे स्थानकासाठी ट्रेन पकडावी लागेल. काठगोदाम हे अल्मोड्याच्या सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आहे.






