Chana Dal palak Chilla Recipe: तुम्हालाही दररोजच्या नाश्त्यासा काय बनवायचं हे सुचत नाही तर मग चणा डाळ आणि पालकाचा पौष्टिक चीलाची रेसिपी एकदा नक्की ट्राय करा.
Chana Dal palak Chilla
Follow Us:
Follow Us:
विस्तार
नाश्त्यासाठी पोहे-उपमा विसरा
नवा चणा डाळ आणि पालकाचा चीला
चविष्ट आणि पौष्टिक पर्याय
सकाळच्या नाश्त्यात चविष्ट पदार्थ खाण्यासोबतच शरीराला पोषण मिळणेही महत्त्वाचे आहे. रोजच्या पोळी, पोहे किंवा उपम्यापेक्षा काहीतरी वेगळे आणि पौष्टिक खायचे असेल, तर चणा डाळ आणि पालकाचा चीला हा एकदा नक्की ट्राय करुन पाहा. चणा डाळीमुळे प्रथिने मिळतात, तर पालकामुळे आहारात हिरव्या पालेभाजीचा समावेश होतो. ही रेसिपी कमी वेळात झटपट तयार होते आणि सकाळच्या व्यस्त वेळापत्रकातही सहज बनवता येते. चला तर जाणून घेऊयात चणा डाळ आणि पालकाचा पौष्टिक चीलाची रेसिपी.
सर्वप्रथम चणा डाळ स्वच्छ धुऊन साधारण काही तास पाण्यात भिजत ठेवा. डाळ चांगली मऊ झाल्यानंतर त्यातील अतिरिक्त पाणी काढून घ्या. त्यानंतर मिक्सरमध्ये डाळ वाटून घ्या. यानंतर, पालक स्वच्छ धुऊन बारीक चिरून घ्या. मिक्सरमध्ये पालक, हिरवी मिरची आणि आले घालून त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट वाटलेल्या चणा डाळीत मिसळा. यानंतर, डाळ आणि पालकाचे मिश्रण एका भांड्यात काढा. त्यात जिरे, हिंग, मीठ आणि आवश्यक असल्यास बारीक चिरलेला कांदा घाला. थोडे पाणी टाकून मिश्रण थोडे घट्ट फेटून घ्या. मिश्रण जास्त पातळ होणार नाही याची काळजी घ्या. आता, तवा मंद आचेवर चांगले गरम करून त्यावर थोडे तेल पसरवा. आता तयार मिश्रणाचा एक गोल चमचामध्ये घ्या आणि तव्यावर टाकून गोलाकार पसरवा. चीला मध्यम आचेवर भाजू द्या. खालची बाजू सोनेरी आणि कुरकुरीत होऊ लागली की त्यावर थोडे तेल सोडून चीला सावधपणे उलटा. दुसरी बाजूही व्यवस्थित भाजून घ्या. चीला दोन्ही बाजूंनी हलका कुरकुरीत झाला की तव्यावरून काढा. अशाच पद्धतीने उरलेल्या मिश्रणाचे चीले तयार करा. गरमागरम चणा डाळ आणि पालकाचा चीला हिरवी चटणी, दही किंवा टोमॅटोच्या चटणीसोबत सर्व्ह करा. चवदार आणि पौष्टिक नाश्त्यासाठी ही रेसिपी नक्की करून पाहा.
टीप : डाळ भिजवण्याचा वेळ आणि मिश्रणाची जाडी यानुसार चीला मऊ किंवा कुरकुरीत होऊ शकतो.