महागाईचा (Inflation) परिणाम सध्या सगळीकडे दिसून येत आहे. महागाईमुळे मुलं न होऊ देण्याचा ट्रेंड जोडप्यांमध्ये वाढत असल्याचं समोर आलं आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अशा जोडप्यांची संख्या हजारोंमध्ये आहे. या जोडप्यांना मुलं जन्मालाही घालायचं नाही आणि मुलं दत्तकही घ्यायचं नाही. या ट्रेंडला चाइल्ड फ्री लाइफ (Child Free Life) किंवा नो किड्स ट्रेंड (No Kids Trend)असं म्हटलं जात आहे.
चाइल्ड फ्री लाइफ म्हणजे मुलांशिवाय जीवन जगणं असा सरळ अर्थ निघतो. मुलं जन्माला येऊ द्यायचं नाही आणि दत्तकही घ्यायचं नाही. या संज्ञेचा वापर सगळ्यात आधी 1900 साली करण्यात आला. मात्र 1970 मध्ये या प्रकाराला जास्त लोकप्रियता मिळाली. फेमिनिस्ट लोकांनी स्वातंत्र्याचं प्रतीक म्हणून केला. त्यानंतर अशा महिलांसाठी ही संज्ञा वापरण्यात आली ज्या महिला मुलांशिवाय जगत होत्या. चाइल्ड फ्री मुव्हमेंट सध्या जोर पकडू लागली आहे. अनेक जण याचं समर्थन करत आहेत.
सर्वेक्षण
अमेरिकेतील दर 5 पैकी 1 जोडप्याला मुल नको आहे, असं एका सर्वेक्षणात आढळून आलं. सर्वेक्षणानुसार 18 ते 49 या वयोगटातील 44% जोडप्यांना मुल नको आहे. इंग्लंड आणि वेल्समध्येही 35 ते 44 या वयोगटातील जोडप्यांना मुल नको आहे. कायम एकत्र कुटुंब व्यवस्थेचा पुरस्कार करणारा भारतही या ट्रेंडचा भाग बनला आहे. या मागची कारणं जाणून घेऊयात.
जोडप्यांना का नकोयत मुलं ?
मात्र या चाइल्ड फ्री लाइफच्या ट्रेंडमुळे देशात वृद्धांची संख्या वाढेल, तसेच तरुणांवरील वर्क लोड वाढेल. मुलांना देशाचं भविष्य मानलं जातं. तर पुढची पिढीच जन्माला आली नाही. तर देशाच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं.