(फोटो सौजन्य: istock)
पश्चिमोत्तासन
या आसनात मानेपासून पायांच्या – घोट्यापर्यंतच्या सर्व पाठीमागच्या शरीराच्या भागास ताण मिळतो त्यामुळे या आसनाला पश्चिमोत्तासमन म्हणतात. हे आसन पाठ आणि कंबरेचे स्नायू, हिप्स आणि हॅमस्ट्रिंगला स्ट्रेच करण्यास मदत करतो. ज्यामुळे प्रजनन व्यवस्थेला फायदा होतो.
भुजंगासन
भुजंगासन केल्याने ओटीपोटात ताण निर्माण होतो. ज्यामुळे गर्भधारणेची शक्यता वाढते. भुजंगासन हे पोटावर झोपून केले जाणारे एक अत्यंत प्रभावी आणि सोपे योगासन आहे, जे पाठीच्या कण्याचे आरोग्य सुधारते आणि ताण कमी करते.
बद्धकोनासन
बद्धकोनासनाच्या सरावामुळे मांड्याच्या आतील भाग, हिप्स, गुडघे आणि जननेंद्रियाच्या स्नायू ताणले जातात. या आसनामुळे प्रसुती प्रक्रिया सुलभ होते.
भ्रामरी प्राणायाम
भ्रामरी प्राणायामामुळे शरीरातील इतर अवयव योग्यरित्या काम -करतात. श्वास घेण्याची क्षमता यामुळे सुधारते. याचबरोबर यामुळे स्ट्रेसपासून देखील मुक्ती मिळते.
जानूशीर्षासन
जानूशीर्षासनद्वारे काल्वस आणि हॅमस्टूरिंग्स – ताणले जातात. तसेच संपूर्ण शरीरातील स्नायूंना सहज आराम मिळतो.
बालासन
बालासन रिकाम्या पोटी करावे. ही मुद्रा गर्भाशयात वाढणाऱ्या बाळाच्या स्थितीसारखीच आहे. यामुळे मांडी, गुडघे, पाठ आणि हिप्स या अवयवांचे स्नायू स्ट्रेच होतात.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)






