Dark Circles: डार्क सर्कल्समुळे हैराण झाला आहात? जाणून घ्या डोळ्याखाली काळी वर्तुळे येण्यामागील कारणे आणि त्यावरील घरगुती उपाय
डोळ्यांभोवती काळे डाग कशामुळे येतात?
काळे डाग घालवण्यासाठी काय करावे?
डार्क सर्कल्स येण्याची कारणे?
Dark Circles: सुंदर दिसण्यासाठी मेकअप केला जातो. मेकअप केल्यामुळे चेहऱ्यावरील काळे डाग, सुरकुत्या आणि त्वचेच्या इतर समस्या कमी होतात. मेकअपमुळे त्वचेवरील डाग बऱ्यापैकी लपले जातात. पण डोळ्यांभोवती आलेले काळे डाग लवकर कमी होत नाही. डोळ्यांभोवती आलेले काळे डाग कायमचे घालवण्यासाठी महिला बरेच वेगवेगळे उपाय करतात. कधी स्किन केअर रुटीनमध्ये बदल केला जातो तर कधी बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या स्किन ट्रीटमेंट, नाईट क्रीम किंवा डार्क सर्कल्स घालवण्यासाठी वेगवेगळ्या क्रीमचा वापर केला जातो. पण तरीसुद्धा डोळ्यांभोवती आलेले काळे डाग काही केल्या लवकर कमी होत नाहीत.(फोटो सौजन्य – istock)
जीवनशैलीतील बदल आणि झोपेच्या समस्या वाढू लागल्यानंतर चेहऱ्यावर मोठ्या प्रमाणात डोळ्यांभोवती काळे डाग येण्यास सुरुवात होते. तासंतास मोबाईल, लॅपटॉप पाहत बसणे, जागरण इत्यादी कारणांमुळे डोळ्यांच्या खाली काळे डाग येतात आणि त्वचा पूर्णपणे निस्तेज होऊन जाते. त्वचा निस्तेज झाल्यानंतर ती पुन्हा एकदा मऊ आणि हायड्रेट करण्यासाठी उपचारांसोबतच डोळ्यांभोवती काळे डाग कशामुळे येतात, याबद्दल कारणे जाणून घेणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. त्वचेची रचना, आनुवंशिकता आणि जीवनशैलीत सातत्याने होणाऱ्या बदलांच्या परिणामामुळे डोळ्यांभोवती त्वचा काळी पडून जाते. चला तर जाणून घेऊया सविस्तर.
रात्रीच्या वेळी उशिरापर्यंत जागे राहणे, पुरेशी झोप न होणे, सतत मानसिक तणाव इत्यादी कारणांमुळे डोळ्यांभोवती काळे डाग येतात. सुरुवातीच्या दिवसांमध्ये अतिशय सौम्य डाग दिसतात. पण कालांतराने डोळे खूप जास्त काळे आणि त्वचा निस्तेज होऊन जाते. शरीरात झोपेची कमतरता निर्माण झाल्यानंतर चेहऱ्यावरील त्वचा फिकट होऊन जाते. याशिवाय डोळ्यांखालील रक्तवाहिन्या अधिक स्पष्ट दिसतात. डोळ्यांना सूज येणे, काळी वर्तुळे अधिक गडद दिसत असतील तर झोपेच्या सवयींमध्ये बदल करणे आवश्यक आहे. नियमित साधारणतः ७ ते ८ तासांची झोप घेणे आवश्यक आहे.
काही व्यक्तींच्या डोळ्यांखाली लहानपणापासूनच काळे डाग असतात. आनुवंशिकता, त्वचेतील रंगद्रव्याचे प्रमाण आणि डोळ्यांखालील त्वचेची नैसर्गिक रचना इत्यादी कारणांमुळे डोळ्यांखालील त्वचा काळी पडू शकते. डोळ्यांखालील रक्तवाहिन्या शरीरावरील त्वचेपेक्षा खूप जास्त पातळ असतात. त्वचेमधील कोलेजन कमी झाल्यानंतर आणि डोळ्यांखालील भागात चरबीचे प्रमाण वाढल्यामुळे रक्तवाहिन्या स्पष्ट दिसू लागतात. डोळ्यांभोवती काळे डाग केवळ झोपेच्या कमतरतेमुळे नाहीतर शरीरात होणाऱ्या बदलांमुळे सुद्धा येऊ शकतात.
Ans: अपुरी झोप, आनुवंशिकता, वयानुसार त्वचेत होणारे बदल, डोळ्यांखालील रंगद्रव्य वाढणे, अॅलर्जी आणि डोळे वारंवार चोळणे यांमुळे काळी वर्तुळे दिसू शकतात.
Ans: डोळ्यांवर स्वच्छ, थंड कापड काही मिनिटे ठेवणे, पुरेशी झोप घेणे आणि त्वचेला योग्य मॉइश्चरायझर लावणे यामुळे काही प्रमाणात आराम मिळू शकतो.
Ans: थंड काकडीचे काप डोळ्यांवर ठेवल्याने थंडावा मिळतो आणि सूज तात्पुरती कमी होऊ शकते. मात्र, काळी वर्तुळे कायमची दूर होतात, याचा ठोस पुरावा नाही.






