ओटीपोटात वाढलेल्या वेदनांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष? ओव्हेरियन सिस्ट फुटण्याच्या आधी शरीरात दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे
एंडोमेट्रिओसिस समस्या कशामुळे उद्भवते?
ओव्हेरियन सिस्ट म्हणजे काय?
ओव्हेरियन सिस्टची लक्षणे कोणती?
पुरुषांच्या तुलनेत महिलांना आरोग्यासंबंधित गंभीर आजारांना सामोरे जावे लागते. शरीरात होणारे हार्मोनल बदल, मासिक पाळीच्या वेदना, गर्भधारणा, रजेनिवृत्ती इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम महिलांच्या आरोग्यावर लगेच दिसून येतो. याशिवाय कौटुंबिक जबाबदाऱ्या, कामाचा वाढलेला तणाव, बिघडलेले मनासिक आरोग्य, आहारात सतत होणारे बदल इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम महिलांच्या आरोग्यावर होतो. महिला कायमच आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. वाढत्या वयात शरीरसंबंधित उद्भवणाऱ्या समस्यांकडे अजिबात लक्ष दिले जात नाही. पण कालातंराने समस्या वाढतात आणि गंभीर स्वरुप घेतात, ज्याचा शरीरावर अतिशय वाईट परिणाम होतो. याशिवाय महिलांमध्ये एंडोमेट्रिओसिस आणि ओव्हेरियन सिस्टच्या समस्या मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहेत. सुरुवातीच्या दिवसांमध्ये अतिशय सामान्य वाटणाऱ्या समस्या कालांतराने वाढू लागतात.(फोटो सौजन्य – istock)
महिला शरीरात होणाऱ्या छोट्या मोठ्या बदलांकडे अजिबात लक्ष देत नाही. तसेच ओव्हेरियन सिस्टचा शरीराला जास्त धोका नसतो. पण कालांतराने समस्या वाढू लागतात आणि शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत झाल्यामुळे तब्येत आणखीनच बिघडू लागते. एंडोमेट्रिओसिस हे प्रामुख्याने प्रजननक्षम वयातील महिलांमध्ये आढळून येणारी समस्या आहे. या स्थितीमध्ये गर्भाशयाच्या आतील अस्थरातील पेशी वाढू लागतात. त्यामुळे काहींना वेदना जाणवतात तर काहींच्या दैनंदिन आयुष्यावर त्याचे परिणाम दिसू लागतात. तसेच ओव्हेरियन सिस्ट वाढल्यामुळे परिस्थिती आणखीनच गुंतागुंतीची होते. चला तर जाणून घेऊया ओव्हेरियन सिस्ट म्हणजे काय आणि त्याची लक्षणे.
ओव्हेरियन सिस्ट म्हणजे स्त्रियांच्या अंडाशयात तयार होणाऱ्या पाण्याच्या किंवा द्रवाने भरलेल्या गाठी. काहीवेळा गर्भाशयाच्या आतमध्ये वाढणाऱ्या गाठी आपोआप विरघळून जातात तर काहीवेळा तयार झालेल्या गाठी मोठ्या होऊन आरोग्याचे गंभीर नुकसान करतात. या गाठी हार्मोनल असंतुलन, अनियमित मासिक पाळी, गर्भधारणा दरम्यान सिस्ट तयार होणे, एंडोमेट्रिओसिस, पॉलीसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम इत्यादी कारणांमुळे ओव्हेरियन सिस्ट तयार होण्याची जास्त शक्यता असते.
शरीराला कोणत्याही आजाराची लागण झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये अतिशय सामान्य लक्षणे दिसू लागतात. एंडोमेट्रिओसिसमध्ये सुरुवातीला अतिशय सामान्य वेदना जाणवतात. पण सिस्टचा आकार मोठा झाल्यानंतर मासिक पाळीदरम्यान, लैंगिक संबंधांवेळी किंवा सामान्य हालचाली करताना सुद्धा वेदना होतात. त्यामुळे या वेदनांकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करावेत.
एंडोमेट्रिओमा हळूहळू वाढतो. पण गर्भाशयात तयार झालेले सिस्ट झपाट्याने वाढू लागते. यामुळे पोटात वजन जाणवणे, अस्वस्थपणा वाढणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात. याशिवाय योग्य उपचार न केल्यास एंडोमेट्रिओसिस अंडाशयाच्या टिश्यूंना हानी पोहचवतो, ज्यामुळे महिलांच्या शरीरातील हार्मोन्स असंतुलित होतात. अतिरिक्त रक्तस्राव, अनियमित पाळी किंवा वेदनादायक पाळी इत्यादी लक्षणे दिसू लागल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Ans: ओव्हेरियन सिस्ट फुटणे म्हणजे अंडाशयात तयार झालेली द्रवयुक्त गाठ अचानक फुटणे होय, ज्यामुळे वेदना आणि इतर लक्षणे दिसू शकतात.
Ans: तीव्र वेदना, अंतर्गत रक्तस्राव (internal bleeding), चक्कर येणे आणि काही वेळा बेशुद्ध होणे असे परिणाम होऊ शकतात.
Ans: वेदना सतत किंवा तीव्र असल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि स्वतःहून औषधे घेणे टाळावे.






