(फोटो सौजन्य: Instagram)
Travel News : भारतीय पर्यटकाने दाखवले ओमानचे अद्भुत सौंदर्य, 400 वर्षे जुनी कहाणी
बांके बिहारी, वृंदावन
View this post on Instagram
उत्तर प्रदेशच्या वृंदावनमधील बांके बिहारी मंदिर कृष्ण भक्तांमध्ये भरपूर लोकप्रिय आहे. इथे भगवान कृष्णाला बांके बिहारीच्या रुपात पूजले जाते. मंदिरातील सर्वात खास गोष्ट म्हणजे इथले भक्तीमय आणि सुखद वातावरण. दर्शनासाठी आलेली लोक भजन, कृष्णाचा जयघोष यांच्यात मग्न झालेली असतात. मंदिराच्या आजूबाजूच्या लहान गल्ल्या वृंदावनातील एक वेगळे जग दाखवून देतात. जर तुम्ही इथे गेलात तर फक्त मंदिराचे दर्शन घेऊ नका तर वृंदावनातील गल्ल्यांमध्ये फिरा, स्थानिक पदार्थांचा आस्वाद घ्या आणि आजूबाजूच्या अन्य धार्मिक स्थळांचीही भेट घ्या.
द्वारकाधीश मंदिर, द्वारका
View this post on Instagram
गुजरातील राज्यातील द्वारका जिल्ह्यात द्वारकाधीश मंदिर आहे जिथे भगवान कृष्णाची राजाच्या रुपात पूजा केली जाते. या ठिकाणाला कृष्णाची नगरी द्वारकेशी जोडले जाते. मंदिराच्या आतील सुबक वास्तुकला आणि समुद्राजवळील त्याचे स्थान या मंदिराला आणखी खास बनवते. भक्त इथे मंदिराच्या दर्शनासह द्वारकेतील इतर धार्मिक स्थळं आणि समुद्रकिनारी असलेल्या ठिकाणांना भेट देणे पसंत करतात. सकाळी आणि संध्याकाळच्या प्रहरी मंदिरातील वातावरण पाहण्याजोगे ठरते.
Travel News : बजेट आणि वाइब्समध्ये सर्वोत्तम ठरतात जगातील ही 4 ठिकाणे
जगन्नाथ मंदिर, पुरी
View this post on Instagram
ओडिशातील जगन्नाथ मंदिर हे भगवान श्रीकृष्णाचा अवतार असलेल्या जगन्नाथ देवाला समर्पित आहे. इथली खासियत म्हणजे रथ यात्रा, परंतु इतर दिवशीही मंदिर आणि पुरीतील वातावरण भाविकांना आकर्षित करते. १२ व्या शतकात या मंदिराची बांधणी करण्यात आली होती. येथील मूर्ती धातू किंवा दगडाच्या नसून पवित्र कडुलिंबाच्या लाकडापासून तयार करण्यात आल्या आहेत. मंदिरात तयार होणारा महाप्रसाद भाविकांमध्ये फार लोकप्रिय आहे. इथे गेलात तर त्याचा आस्वाद घ्यायला विसरु नका. तुम्ही इथे मंदिरासोबतच, शहरातील समुद्रकिनारे, खाद्यसंस्कृती आणि पारंपरिक संस्कृतीचा अनुभव घेऊ शकता.






