Nankhatai Recipe: 'या' टिप्स फाॅलो करून प्रेशर कुकरमध्ये बनवा बेकरीस्टाईल खुसखुशीत नानकटाई, खाताना प्रत्येकजण करेल कौतुक
Nankhatai Recipe: दिवाळी सणाला अवघे काही दिवस शिल्ल्क राहीले आहेत. सणावरांच्या दिवसांमध्ये घरात वेगवेगळे गोडाचे पदार्थ बनवले जातात. त्यातील सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे नानकटाई. नानकटाई हा अतिशय लोकप्रिय पदार्थ आहे. पारंपरिक भारतीय कुकीज सगळ्यांच्या घरात आवर्जून बनवले जाते. लहानांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांच नानकटाई खायला खूप जास्त आवडते. ओव्हनशिवाय किंवा एअर फ्रायरशिवाय नानकटाई बनवता येत नाही असे कायमच सगळ्यांना वाटते. पण घरच्या घरी कुकरमध्ये सुद्धा बेकरीसारखी परफेक्ट नानकटाई बनवू शकता. तोंडात टाकताच विरघळून जाणारी नानकटाई एकदा खाल्ल्यानंतर पुन्हा पुन्हा खाण्याची सगळ्यांच ईच्छा होईल. कुकर, ओव्हन आणि एअर फ्रायरमध्ये नानकटाई बनवण्याऐवजी कुकरमध्ये झटपट होणारी नानकटाई तुम्ही बनवू शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)






