Hair Oiling Right Time
केसांची योग्य निगा राखण्यासाठी तेल लावणे ही जुनी पद्धत आहे. केसांचा कोरडेपणा कमी करणे, टाळूला पोषण देणे आणि केस सॉफ्ट करण्यासाठी अनेकजण नियमितपणे हेअर ऑयलिंग करतात. मात्र, केसांना तेल लावल्याने लगेच चमत्कार दिसेल असे नाही.तर, तेल किती वेळ ठेवायचे, किती प्रमाणात लावायचे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तेल लावण्याची योग्य वेळ कोणती याचाही केसांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. काहीजण रात्री तेल लावतात, तर काहीजण केस धुण्यापूर्वी ऑयलिंग करतात. मग यापैकी योग्य पद्धत कोणती? जाणून घेऊयात.
कर्करोगाविरोधातील लढ्याला नवी दिशा! HNCII च्या देशव्यापी मोहिमेची गोरखपूरमधून सुरुवात
तेल लावण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे केस धुण्यापूर्वी. तुम्ही आंघोळीच्या किमान ३० मिनिटे आधी, किंवा काही तास आधीही, हलक्या प्रमाणात तेल लावू शकता. यामागील वैज्ञानिक कारण असे आहे की, जेव्हा तुम्ही केस धुता, तेव्हा पाणी आणि शॅम्पू यांच्यातील घर्षणाचा तुमच्या केसांवर परिणाम होतो. त्यामुळे केस धुण्यापूर्वी त्यांना हलक्या हाताने तेल लावल्यास केसांवरील कोरडेपणा कमी करण्यास मदत होते.
जर तुमच्याकडे सकाळी केस धुण्यासाठी वेळ असेल, तर हा पर्याय तुमच्यासाठी चांगला आहे. तुम्ही सकाळी लवकर उठून केसांना तेल लावू शकता आणि काही तासांनंतर ते धुवू शकता. ज्यांना रात्रभर चिकट केसांमुळे झोपायला त्रास होतो, त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. शिवाय, जर तुमचे केस खूप पातळ असतील आणि तेलाच्या जडपणामुळे त्यावर लवकर परिणाम होत असेल, तरीही सकाळी तेल लावणे प्रभावी ठरू शकते.
केसांची चांगली वाढ व्हावी म्हणून तेल रात्रभर ठेवणे आवश्यक आहे, असे तुम्ही अनेक लोकांकडून ऐकले असेल. मात्र, जास्त वेळ तेल टाळूवर ठेवले म्हणजे अधिक फायदा होईलच असे नाही. उलट, काही व्यक्तींमध्ये टाळू तेलकट होणे, घाण साचणे किंवा कोंडा आणि खाज वाढण्याची शक्यता असू शकते.त्यामुळे, रात्रभर केसांना तेल लावू नका.
जर तुमचे केस खूप कोरडे आणि लगेच तुटत असतील, तर तुम्ही टाळूपासून केसांच्या लांबीपर्यंत थोडेसे तेल लावू शकता. याउलट, जर तुमची टाळू खूप तेलकट असेल, तर तुम्ही थेट टाळूवर जास्त तेल लावू नये. तेल लावताना टाळूवर जोरदार चोळणे किंवा नखांनी मसाज करणे टाळा. बोटांच्या टोकांनी हलक्या हाताने तेल मसाज करणे पुरेसे आहे. केसांच्या गरजेनुसार तेलाचे प्रमाण ठरवा आणि केस धुताना टाळू व्यवस्थित स्वच्छ करा.






