Makhana Coconut Barfi Recipe: जर तुम्हालाही उपवासात काहीतरी गोड खाण्याची इच्छा असेल तर ही मखाना- खोबऱ्याच्या बर्फीची रेसिपी एकदा नक्की ट्राय करा.
Makhana Coconut Barfi Recipe
Follow Us:
Follow Us:
विस्तार
उपवासासाठी खास रेसिपी
बनवा मखाना-खोबऱ्याची बर्फी
जाणून घ्या सोपी रेसिपी
Navaratri Special Recipe: नवरात्रीचा उपवास म्हटलं की साबुदाणा खिचडी, भगर आणि बटाट्याच्या पदार्थ. उपवासात दरवेळी तेच पदार्थ खाऊन कंटाळ येतो. पण नवरात्रीच्या उपवासात अनेकांना गोड पदार्थ खाण्याची इच्छा होतेच. मग यंदा उपवासासाठी खास मखाना आणि खोबऱ्याची बर्फी नक्की करून पाहा. बाजारातून मिठाई आणण्याऐवजी घरच्या घरी कमी वेळात तयार होणारी ही बर्फी चवीला स्वादिष्ट आणि हेल्दी आहे. अगदी काही सोप्या साहित्यांसोबत तुम्ही हा पदार्थ झटपट तयार करु शकता. चला तर जाणून घेऊयात मखाना-खोबऱ्याची पौष्टिक बर्फीची सोपी रेसिपी.
चवीनुसार खजूराची पेस्ट किंवा अन्य योग्य गोडवा देणारा पर्याय
अर्धा चमचा वेलची पूड
आवडीनुसार काजू किंवा बदामाचे काप
बर्फी बनवण्याची सोपी कृती
सर्वप्रथम कढईत थोडे तूप गरम करून त्यात मखाना मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या. मखाना थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये त्याची बारीक पूड तयार करा.आता कढईत थोडे तूप घालून त्यात किसलेले खोबरे हलके परतून घ्या. त्यानंतर त्यात मावा घालून मंद आचेवर सतत ढवळत राहा. या मिश्रणात मखान्याची पूड, खजूराची पेस्ट आणि वेलची पूड घाला. सर्व साहित्य एकजीव होईपर्यंत मिश्रण व्यवस्थित हलवा. मिश्रण घट्ट होऊन कढईच्या कडा सोडू लागले की गॅस बंद करा.आता, एका ताटाला किंवा ट्रेला थोडे तूप लावून त्यात तयार मिश्रण पसरवा. वरून काजू-बदामाचे काप घाला. मिश्रण पूर्णपणे थंड होऊन सेट झाल्यानंतर सुरीने बर्फीच्या आकारात काप करा. मखाना- खोबऱ्याची हेल्दी आणि टेस्टी बर्फी तयार आहे.
बर्फी अधिक स्वादिष्ट बनवण्यासाठी खास टिप्स
मखाना भाजताना मंद आचेचा वापर करा, त्यामुळे ते छान कुरकुरीत होतील.
खजुराची पेस्ट वापरत असल्यास गोडवा आधी तपासून घ्या.
मिश्रण जास्त कोरडे वाटल्यास थोडे दूध घालू शकता.
बर्फीचे मिश्रण ताटात पसरवल्यानंतर पूर्णपणे थंड होऊ द्या.