Beauty Hacks To avoid For Sensitive Skin
Health Tips: डायबिटीज-बीपीचा त्रास आहे? नवरात्रीचा उपवास करताना रुग्णांनी कोणती काळजी घ्यावी?
लिंबाचा रस आम्लधर्मी असतो आणि त्यामुळे त्वचेला त्रास होऊ शकतो. सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यास, त्यामुळे त्वचेवर गंभीर प्रतिक्रिया आणि व्रण देखील होऊ शकतात. चेहरा स्वच्छ ठेवण्यासाठी माइल्ड म्हणजेच सौम्य क्लीन्झर वापरा.
बेकिंग सोडा त्वचेचा नैसर्गिक PH बॅलन्स बिघडवू शकतो. यामुळे कोरडेपणा, जळजळ आणि स्कीन बॅरियर म्हणजेच संरक्षक थराला नुकसान होऊ शकते. यामुळे त्याचा घरगुती फेस स्क्रब म्हणून वापर टाळा.
डेड स्कीन काढण्यासाठी वारंवार स्क्रब करण्याची आवश्यकता नाही. जास्त प्रमाणात स्क्रब आणि एक्सफोलिएटिंग प्रोडक्ट्समुळे सेंसिटिव्ह त्वचेची जळजळ वाढू शकते. त्यामुळे, तुमच्या त्वचेच्या गरजेनुसार एक्सफोलिएट करा.
नवीन प्रोडक्टस संपूर्ण चेहऱ्यावर लावण्यापूर्वी, सर्वात आधी त्वचेच्या लहान भागावर पॅच टेस्ट करा. काही दिवस रिअॅक्शनचे निरीक्षण करा. परंतु, पॅच टेस्टद्वारे प्रत्येक ऍलर्जीची प्रतिक्रिया लक्षात येईलच असे नाही. त्यामुळे जर तुम्हाला स्कीन अॅलर्जी असेल तर आधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
सोशल मीडियावर व्हायरल असण्याचा अर्थ असा नाही की एखादा फेस पॅक सर्व प्रकारच्या स्कीनसाठी सुरक्षित आहे. सुगंध, सेंटेंड ऑइल आणि काही नैसर्गिक घटकांमुळे देखील ॲलर्जी किंवा जळजळ होऊ शकते.
सेंसिटिव्ह स्कीनसाठी तुमची स्किनकेअर रुटीन जितकी सोपी असेल, तितकेच नवीन प्रोडक्टसमुळे होणाऱ्या जळजळीची कारणे ओळखणे सोपे जाईल. तुमचा चेहरा नेहमी सौम्य क्लीन्झरने किंवा फेस वॉशने स्वच्छ करा. तुमच्या स्कीन टाइप प्रमाणे मॉइश्चरायइजर लावा. तसेच, नियमितपणे सनस्क्रीन वापरा. महत्वाची गोष्ट म्हणजे, एकाच वेळी खूप जास्त नवीन प्रोडक्ट्स वापरणे टाळा.
Sore Throat Remedies: सर्दी-खोकल्याने घसा दुखतोय, बोलणंही कठीण झालंय? घरच्या घरी करा ‘हे’ सोपे उपाय






