
फोटो सौजन्य - Social Media
@zeezest या सोशल मीडिया हॅन्डलने ही बाब समोर आणली आहे. ही बाब कळवा स्थानकाच्या परिसरातील ऑटो चालकांचा तसेच अधिकाऱ्यांचा अनुभव आहे. असे म्हणतात की कळव्याला बारा ते साडे बाराच्या सुमारास एक लोकल अंधारातून वेगात येते आणि स्थानकावर येऊन थांबते. जेव्हा ही लोकल कळवा स्थानकावर येते तेव्हा त्यावेळी कळवा स्थानक पूर्ण शांत असते. स्थानकावर कुणीही आढळत नाही. ज्यांनी-ज्यांनी ही घटना अनुभवली आहे, त्यावेळी तेथे कुणीही नव्हते.
असे म्हणतात की ही घटना दररोज कळवा स्थानकावर घडते. घटना साडे 12 च्या आसपास घडते, जेव्हा संपूर्ण स्थानक खाली असतं. या पोस्टखाली अनेक कळवा वासियांनी कमेंट्स केले आहेत. त्यातील अनेकांचे म्हणणे आहे ही केवळ अफवा आहे तर काहींचे म्हणणे आहे या बाबी खऱ्या आहेत. काही म्हणतात ही नक्कीच कारशेडला जाणारी ट्रेन असेल पण सत्य हेच की कळवा स्थानकावर कारशेड ट्रेन कधी येतच नाही.