एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल! १० मिनिटांमध्ये साऊथ इंडियन पद्धतीने बनवा टेस्टी टोमॅटो राईस, नोट करा रेसिपी
Tomato Rice Recipe: लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं रात्रीच्या जेवणात काहींना काही टेस्टी हवे असते. पण कामाच्या धावपळीमध्ये जेवण बनवण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही. अशावेळी झटपट डाळभात किंवा दालखिचडी बनवून खाल्ली जाते. पण नेहमीच डाळ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन खाण्याची इच्छा झाल्यास साऊथ इंडियन पद्धतीमध्ये टोमॅटो राईस बनवू शकता. टोमॅटो राईस बनवण्यासाठी खूप कमी साहित्य आणि कमी वेळात पदार्थ तयार होतो. लहान मुलं भाज्या खाण्याचा खूप जास्त कंटाळा करतात, अशावेळी मुलांना या पद्धतीने बनवलेला टोमॅटो राईस खाण्यास द्यावा. ज्यामुळे मुलांच्या शरीराला आवश्यक पोषण मिळेल आणि आरोग्य सुधारण्यास मदत होईल. टोमॅटोमध्ये विटामिन सी आणि इतर आवश्यक पोषक घटक सुद्धा मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. ज्यामुळे त्वचेला सुद्धा फायदे होतात. चला तर जाणून घेऊया टोमॅटो राईस बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)






