उन्हाळ्यात हलके पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास झटपट बनवा कलिंगड मक्याचे सॅलड, पचनक्रिया राहील सुरळीत
तीव्र उष्णता आणि सतत येणाऱ्या घामामुळे शरीरात खूप जास्त थकवा, अशक्तपणा जाणवू लागतो. बऱ्याचदा भूक लागल्यानंतर वेगवेगळ्या टेस्टी पदार्थाचे सेवन केले जाते. दुपारच्या जेवणात किंवा संध्याकाळच्या नाश्त्यात तिखट आणि अतिमसालेदार पदार्थ आणून खाल्लेले जातात. पण हे पदार्थ खाल्ल्यानंतर पोटात उष्णता वाढते आणि अपचनाच्या समस्या वाढून आरोग्य बिघडून जाते. त्यामुळे संध्याकाळच्या वेळी लागलेली हलकी भूक भागवण्यासाठी घरच्या घरी कलिंगड मक्याचे सॅलड बनवावे. सॅलड खाल्ल्यामुळे पोट सुद्धा दीर्घकाळ भरलेले राहते आणि पचनक्रिया सुद्धा सुरळीत चालू राहते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात कलिंगड उपलब्ध असतात. कलिंगडमध्ये ९२ टक्के पाणी असते, ज्यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. शरीरात निर्माण झालेली पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी कलिंगड आणि इतर पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. कलिंगड मक्याच्या दाण्यांचे सॅलड लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खूप जास्त आवडेल. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – AI)
ओव्हनची भासणार नाही गरज! १० मिनिटांमध्ये तव्यावरच बनवा टेस्टी गार्लिक ब्रेड, नोट करून घ्या रेसिपी






