Mathura Peda Recipe: यंदाच्या जन्माष्टमीला (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
साखर – २ कप
पाणी – अर्धा कप
तूप – ४ ते ५ चमचे
मिल्क पावडर – २ कप
दूध – अर्धा कप
सजावटीसाठी- थोडे बारीक कापलेले सुकामेवा
तगार बनवणे
सगळ्यात आधी गॅसवर कढई ठेवा. त्यात २ कप साखर आणि अर्धा कप पाणी टाका. मध्यम आचेवर साखर विरघळेपर्यंत हलवत राहा. साखरेला उकळी आली आणि वर फेस आला की त्यात एक चमचा तूप टाका. आता गॅस बंद करा आणि ते मिश्रण सारखं हलवत राहा. थोड्या वेळाने ते कोरडं, पांढरं होईल. यालाच तगार म्हणतात.
दुसरी स्टेप – मिल्क पावडर भाजणे
आता दुसरी कढई घ्या, त्यात ४ चमचे तूप टाका. तूप गरम झालं की त्यात २ कप मिल्क पावडर टाका. गॅस एकदम मंद ठेवा आणि मिल्क पावडर भाजून घ्या. सारखं हलवत राहा नाहीतर जळेल. त्याचा रंग थोडा बदलून हलका तपकिरी झाला की गॅस बंद करा.
तिसरी स्टेप – दोन्ही मिक्स करणे
ती कढई गॅसवरून खाली उतरवा. त्यात आत्ता बनवलेला १ कप तगार टाका. दोन्ही मिश्रण एकजीव करून घ्या. व्यवस्थित मिक्स करा म्हणजे गुठळ्या राहणार नाही याची काळजी घ्या. हाताला थोडं तूप लावा म्हणजे चिकटणार नाही.
Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी
शेवटची स्टेप – पेढे वळणे
मिश्रण थोडं कोमट झालं की त्याचे छोटे छोटे गोळे करा. गोळ्याला मधोमध अंगठ्याने थोडं दाबा म्हणजे पेढ्याचा आकार येईल. वरून काजू-बदामाचे काप लावा. थोडं दाबा म्हणजे ते पडणार नाहीत.झाले! तुमचे मऊ, तोंडात टाकताच विरघळणारे मथुरा स्टाईल पेढे तयार आहेत. हे पेढे कान्हाला नैवेद्य म्हणून दाखवा आणि घरच्यांना खाऊ घाला. बाहेरच्या पेढ्यांपेक्षा घरचे पेढे जास्त भारी लागतात.
महर्षी गर्गाचार्य यांनी कृष्णाचे नाव ठेवले . त्यांना गर्ग मुनी म्हणून पण ओळखतात. ते यादव कुळाचे कुलगुरू होते. त्यामुळे नवीन बाळाचे नाव ठेवण्याचा अधिकार त्यांचाच होता. पण ही गोष्ट साधी सरळ नव्हती. यामागे एक मोठी गुप्तता होती. आकाशवाणी झाली होती की देवकीचा आठवा मुलगा कंसाचा वध करेल. कंसाने देवकी आणि वासुदेवाला कारागृहात टाकले होते. आणि त्यांच्या सात मुलांना मारले होते. Mathura Peda Recipe:
Krishna Janmashtami 2026: श्रीकृष्णांचं नाव नेमकं कोणी ठेवलं …






