Zunka Recipe : झणझणीत झुणका आणि खमंग भाजलेली भाकरी यांचे काँम्बीनेशन काही वेगळेच लागते. रात्रीच्या जेवणासाठी हा पदार्थ एक चांगला पर्याय ठरतो. अस्सल गावराण पद्धतीत झुणका कसा तयार करायचा याची रेसिपी आज आपण जाणून घेणार आहोत.
(फोटो सौजन्य: Pinterest)
Follow Us:
Follow Us:
विस्तार
झुणका भाकरी हा महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृतीतील एक लोकप्रिय आणि पारंपारिक पदार्थ आहे.
रात्रीच्या जेवणासाठी ही रेसिपी एक चांगला पर्याय ठरते.
भाजी काय बनवावी ते सुचत नसल्यास तुम्ही घरी झुणका बनवू शकता.
महाराष्ट्राच्या पारंपरिक स्वयंपाकात झुणक्याला खास स्थान आहे. कमी साहित्यामध्ये, झटपट आणि चविष्ट पदार्थ तयार करण्याची ग्रामीण महाराष्ट्रीयन पाककलेची खासियत झुणक्यात पाहायला मिळते. मुबलक साहित्यापासून तयार केला जाणारा झणझणीत झुणका ज्वारी-बाजरीच्या भाकरीसोबत चवीला अप्रतिम लागतो. महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृतीतील हा पदार्थ आजही कुटुंबातील सर्वांच्या आवडीचा ठरणारा पदार्थ आहे. विशेष म्हणजे याला तयार करण्यासाठी स्वयंपाकघरातील मुबलक साहित्यांचीच गरज लागते. रात्रीच्या जेवणासाठी भाजी काय बनवावी ते सुचत नसल्यास तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता. चला रेसिपीनोट करून घेऊयात.
एका भांड्यात बेसन घेऊन त्यात थोडे मीठ आणि हळद मिसळा. त्यात थोडे पाणी घालून गुठळ्या होणार नाहीत अशा पद्धतीने मिश्रण तयार करा.
कढईत तेल गरम करून त्यात मोहरी आणि जिरे घाला. ते तडतडल्यावर हिंग, ठेचलेला लसूण आणि हिरवी मिरची घालून काही सेकंद परतून घ्या.
आता बारीक चिरलेला कांदा घालून तो हलका सोनेरी होईपर्यंत परता. कांदा चांगला परतल्यामुळे झुणक्याला अधिक खमंग चव येते.
हळद आणि लाल तिखट घालून मिश्रण हलवा. मसाले जळणार नाहीत याची काळजी घ्या.
तयार केलेले बेसनाचे मिश्रण कढईत ओतत असताना दुसऱ्या हाताने सतत ढवळत राहा. यामुळे बेसनाच्या गुठळ्या होणार नाहीत.
मध्यम आचेवर झुणका सतत ढवळत शिजवा. पाणी आटून बेसन घट्ट होऊ लागले की झुणका तयार होत असल्याचे समजा. गरजेनुसार थोडे पाणी घालून त्याची घट्टपणा आपल्या आवडीनुसार ठेवा.
शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून झुणका एकदा व्यवस्थित मिसळा. गरमागरम झुणका ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी, कांदा आणि हिरव्या मिरचीच्या ठेच्यासोबत वाढा.
Web Title: Make tasty and spicy gavran style zunka at home marathi recipe