
हस्तरेषा (Palmistry) शास्त्राला आपल्या देशात विशेष महत्तव आहे. यावरून अनेक गोष्टींचं निरसरण होतं असं त्या क्षेत्रातील तज्ञ सांगतात. ज्योतिषशास्त्रात (Astrology) ज्याप्रमाणे व्यक्तीच्या कुंडलीतील ग्रहांच्या आधारे भविष्यातील गोष्टींचा अंदाज व्यक्त केला जातो, त्याचप्रमाणे हस्तरेषाशास्त्रात व्यक्तीच्या हाताच्या रेषा, चिन्हे, आकार यांचे विश्लेषण करून भविष्य कळते. हस्तरेषाशास्त्रात काही रेषा महत्त्वाच्या मानल्या जातात. उदा. जीवनरेषा, भाग्यरेषा, धनरेषा, विवाह रेषा, राहू रेषा इ. आज आपण राहू रेखाबद्दल बोलत आहोत. ज्याप्रमाणे कुंडलीतील राहूची विस्कळीत स्थिती जीवनात संकटं आणू शकते, त्याचप्रमाणे हातातील राहूच्या स्थितीवरून भविष्यातील घडामोडी कळू (Palmistry Tips) शकतात.
तळहातातील एखादी रेषा मंगळाच्या क्षेत्रातून निघून जीवनरेषा आणि भाग्यरेषा ओलांडल्यानंतर मेंदू रेषेला स्पर्श करते किंवा ती ओलांडून हृदय रेषेकडे जाते तिला राहू रेषा म्हणतात. झी न्यूजने दिलेल्या बातमीनुसार तळहातावर एकापेक्षा जास्त राहू रेषा असू शकतात. या रेषा तळहाताच्या मध्यभागी असतात. पाहूयात काय यांचं महत्त्व,