Paneer Kathi Roll Recipe: तुम्हालाही नाश्त्यासाठी काहीतरी चटपटीत तसेच हेल्दी टेस्टी बनवायचे असेल ही पनीर काठी रोल रेसिपी नक्की ट्राय करा.
Paneer Kathi Roll Recipe
Follow Us:
Follow Us:
विस्तार
नाश्त्यात रोजचं तेच खाऊन कंटाळलात?
बनवा झटपट पनीर काठी रोल
चटपटीत, हेल्दी अन् टेस्टी
नाश्त्यासाठी रोज तेच पोहे, उपमा किंवा पराठे खाऊन कंटाळा आला असेल, तर मेनूमध्ये काहीतरी हटके नक्की करून पाहा. पनीर काठी रोल हा टेस्टी आणीि हेल्दी नाश्ता आहे. शिवाय सकाळच्या नाश्त्याला खाल्ल्यास जास्त वेळ पोट भरलेले वाटते. तसेच, हा पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडू शकतो. मसालेदार पनीर, मिक्स भाज्या, कांदा आणि चटणीचा स्वाद यांच्या मिश्रणाने तयार होणार पनीर रोल एकदा नक्की ट्राय करुन पाहा. चला तर मग, घरच्या घरी पनीर काठी रोल कसा बनवायचा ते जाणून घेऊयात रेसिपी.
सर्वप्रथम पनीरचे छोटे चौकोनी तुकडे करून बाजूला ठेवा. यानंतर, कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची बारीक चिरून घ्या. आता एका कढईत थोडे तेल घालून चांगले गरम करून घ्या. त्यात आले-लसूण पेस्ट आणि कांदा घाला. कांदा थोडा मऊ झाल्यावर शिमला मिरची आणि टोमॅटो घालून काही मिनिटे परता. आता हळद, लाल तिखट, गरम मसाला, चाट मसाला आणि मीठ घालून सर्व साहित्य व्यवस्थित मिसळा. तयार मसाल्यामध्ये पनीरचे तुकडे घालून हलक्या हाताने मिसळा. पनीर जास्त वेळ शिजवू नका. शेवटी लिंबाचा रस आणि कोथिंबीर घालून गॅस बंद करा. तवा गरम करून पोळी हलकी भाजून घ्या. पोळीवर हिरवी चटणी पसरवा. त्यावर पनीरचे सारण, बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घाला. पोळी दोन्ही बाजूंनी आत दुमडून घट्ट रोल करा. तव्यावर थोडे बटर किंवा तेल लावून रोल हलका भाजून घ्या. बाहेरून पोळी किंचित कुरकुरीत झाली की रोल तयार झाला.
पनीर काठी रोल बनवताना लक्षात ठेवा
पनीर जास्त वेळ शिजवल्यास ते कडक होऊ शकते, त्यामुळे कमी वेळ परता.
रोल अधिक चविष्ट करण्यासाठी पोळीवर हिरवी चटणीसोबत थोडा टोमॅटो सॉस लावू शकता.
कांदा आणि शिमला मिरची थोडी कुरकुरीत ठेवली तर रोलची चव आणखी छान लागते.
आवडीनुसार सारणामध्ये गाजर, कोबी किंवा कॉर्नसारख्या भाज्यांचाही वापर करू शकता.