नाश्त्यासाठी किंवा स्नॅक टाइमसाठी परफेक्ट! लहान मुलांसाठी झटपट बनवा हेल्दी टेस्टी चॉकलेट स्मूदी
Smoothie Recipe: कामाच्या धावपळीमध्ये सकाळचा नाश्ता बनवायला जास्त वेळ मिळत नाही. कायमच घाईमध्ये तेच ठराविक पदार्थ बनवले जातात. पण तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास विकतचे पदार्थ आणून खाल्ले जातात. पण नेहमीच तेलकट, तिखट किंवा प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे शरीरासाठी अजिबात चांगले नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये चॉकलेट स्मूदी बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेली चॉकलेट स्मूदी लहान मुलांसह मोठ्यांना खूप जास्त आवडेल. सुका मेवा आणि दुधाचा वापर करून बनवलेला पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. याशिवाय घरी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी सुद्धा चॉकलेट स्मूदी बनवू शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)






