(फोटो सौजन्य: Pinterest)
Travel News : जगातील एकमेव तरंगणारे उद्यान आहे भारतात! कुठे आहे ते जाणून घ्या
इंडोनेशिया
फार कमी लोकांना हे ठाऊक असेल की इंडोनेशिया या देशात रामलीला आयोजित केले जाते. खरंतर हा एक मुस्लिम लोकसंख्या असलेला देश आहे, पण तरीही रामायण तिथल्या संस्कृतीत खोलवर रुजलेले आहे. इथे भगवान राम कोणत्या एका धर्माचे नसून ते मानवी आदर्शांचे प्रतीक मानले जाते. इथे जावा आणि बालीमध्ये रामलीला सुंदर नृत्य आणि नाटक प्रदर्शदनातून सादर केली जाते.
थायलंड
खरंतर थायलंडच्या संस्कृतीमध्येही रामायणाचा खोलवर परिणाम पाहायला मिळतो. इथे रामायणाला रामकियन या नावाने ओळखले जाते, जे देशाचे राष्ट्रीय महाकाव्य देखील आहे. इथे रामायणातील प्रसंग खूप सुंदररित्या नृत्य आणि संगीताच्या तालावर सादर केले जातात. इथे रामायण सादर करताना कलाकार एक विशेष मुखवटा घालतात ज्याला खोन या नावाने ओळखले जाते.
कंबोडिया
कंबोडियाचा इतिहास हा हिंदू संस्कृतीशी जोडलेला मानला जातो. इथे रामायणाला रीमकेर या नावाने ओळखले जाते. येथील मंदिरांमध्ये आणि ऐतिहासिक ठिकाणी रामायणातील दृष्यांचे फार सुंदरपणे प्रदर्शन केले जाते. कलाकार सुंदर पोशाख आणि दागिने घालून रामलीला सादर करतात.
उत्तर प्रदेशच्या नोएडात आहे रावणाचे गाव! इथे दसरा साजरा केला जात नाही तर शोक व्यक्त केला जातो
त्रिनिदाद आणि टोबॅगो आणि गयाना
इतिहासानुसार, १९ व्या शतकात ब्रिटीश राजवटीत भारतातून करारबद्ध मजुरांना ऊसाच्या शेतात काम करण्यासाठी या देशांमध्ये पाठवण्यात आले. हे मजूर स्वत:साठी आपली संस्कृती देखील घेऊन गेले. त्यांनी देशामध्ये रामलीला सादर केली आणि तेव्हापासून ते इथे लोकप्रिय झाले.
Ans: इंडोनेशिया, थायलंड, कंबोडिया, त्रिनिदाद आणि टोबॅगो तसेच गयाना या देशांमध्ये रामायणाशी संबंधित नाट्यपरंपरा पाहायला मिळतात.
Ans: थायलंडमध्ये रामायणाच्या स्थानिक आवृत्तीला ‘रामकियन’ असे म्हटले जाते. त्यातील प्रसंग पारंपरिक नृत्य, संगीत आणि मुखवट्यांच्या माध्यमातून सादर केले जातात.
Ans: १९व्या शतकात भारतातून करारबद्ध मजूर या प्रदेशात गेले. त्यांनी आपल्यासोबत भारतीय संस्कृती आणि रामायणाची परंपरा नेली, जी पुढे स्थानिक सांस्कृतिक जीवनाचा भाग बनली.






