सकाळच्या नाश्त्यात काय खावं सुचत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्वादिष्ट राजगिरा उपमा, नोट करा रेसिपी
Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यात प्रत्येकाला काहींना काही चमचमीत आणि टेस्टी पदार्थ खाण्याची ईच्छा होते. अशावेळी कायमच विकताचा नाश्ता आणून खाल्ला जातो. वडापाव, मिसळ, मेदूवडा इत्यादी तेलकट, तिखट पदार्थ सकाळच्या नाश्त्यात खाल्ले जातात. पण उपाशी पोटी तेलकट, तिखट पदार्थ खाल्यामुळे पचनक्रिया बिघडण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे नाश्त्यात कायमच हेल्दी आणि टेस्टी पदार्थांचा समावेश करावा. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये स्वादिष्ट राजगिरा उपमा बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेला उपमा चवीला अतिशय टेस्टी लागतो. राजगिरा खाल्यामु्ळे पोट जास्त वेळ भरलेले राहते आणि शरीराला सुद्धा फायदे होतात. सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता करणे गरजेचे आहे. कारण उपाशी पोटी जास्तवेळ राहील्यामुळे शरीराला गंभीर आजाराची लागण होऊ शकते. चला तर जाणून घेऊया रेसिपी. (फोटो सौजन्य – AI)






