Skin Care Tips: कच्च्या दुधाने ५ मिनिटं नियमित चेहऱ्यावर करा मसाज, आठवडाभर त्वचेवर येईल चमकदार ग्लो
बदलत्या ऋतूनुसार स्किन केअर आणि हेअर केअर रुटीनमध्ये बदल करणे आवश्यक आहे. कारण वातावरणात होणाऱ्या बदलांचा परिणाम चेहऱ्यावर लगेच दिसून येतो. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचेवर वाढलेल्या टॅनिंगमुळे चेहरा खूप जास्त निस्तेज आणि काळवंडलेला दिसू लागतो. अशावेळी महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करतात तर कधी महागड्या ट्रीटमेंट करून घेतल्या जातात. त्वचेसंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर कायमच बाजारातील वेगवेगळ्या क्रीम किंवा लोशन वापरण्याऐवजी घरगुती उपाय करून पाहावेत. घरगुती उपाय केल्यामुळे त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल. यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येईल आणि त्वचेला कोणतीही हानी पोहचणार नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग आणि त्वचेच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी कच्च्या दुधाचा कशा पद्धतीने वापर करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – istock)
मागील अनेक वर्षानुसार दुधाने अंघोळ करण्याची परंपरा आहे. अंघोळीच्या पाण्यात थोडस दूध मिक्स करून अंघोळ केल्यास खूप जास्त फ्रेश वाटते. यामुळे त्वचेच्या कमी होण्यास मदत होते, असे कायमच मानले जाते. तसेच बाजारात मिळणाऱ्या फेसवॉश, साबण आणि इतर अनेक स्किन केअर प्रॉडक्टमध्ये काही प्रमाणात दुधाचा वापर केला जातो. त्यामुळे स्किन केअर रुटीनमध्ये दुधाचा वापर करावा. रोज चेहरा पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर वाटीमध्ये दूध घेऊन संपूर्ण चेहऱ्यावर लावावे. त्यानंतर हलक्या हाताने ५ मिनिट मसाज करावा. चेहऱ्यावरील दूध पूर्णपणे कोरडे झाल्यानंतर हलक्या हाताने त्वचा स्वच्छ करून घ्यावी.
चेहऱ्यावरील चमक वाढवण्यासाठी दुधाचा वापर करावा. यामुळे चेहऱ्यावर आलेले पिंपल्सचे काळे डाग, मुरूम आणि डाग कमी होण्यास मदत होईल. त्वचेसंबंधित समस्या उद्भवल्यानंतर कायमच केमिकल युक्त प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करावे. चेहऱ्यावर दूध नॅच्युरल क्लिंजरप्रमाणे काम करते. कापसाच्या मदतीने संपूर्ण चेहऱ्यावर दूध लावून नंतर घ्या आणि त्यानंतर हलक्या हाताने मसाज करा. त्वचेवर जमा झालेली डेड स्किन नष्ट करण्यास मदत होईल. चेहऱ्यावर जमा झालेली धुळ, माती स्वच्छ करण्यासाठी दुधाचा वापर करू शकता.
नियमित चेहऱ्यावर दूध लावल्यास त्वचा आतून हायड्रेट होण्यास मदत होईल. दूध त्वचा डिप क्लिनिंग करते, ज्यामुळे चेहऱ्यावर आलेले काळे डाग कमी होऊन त्वचा उजळदार होते. उन्हाळ्यात चेहऱ्यावर जमा झालेले अतिरिक्त तेल कमी करण्यासाठी दूध चेहऱ्यावर लावावे. यामुळे आठवडाभरात त्वचा मुलायम आणि सॉफ्ट होईल. यामध्ये असलेले औषधी गुणधर्म त्वचेचा रंग सुधारण्यास मदत करते. पण दूध प्रत्येकाला सूट होईल असे नाही. त्यामुळे दुधाचा वापर करण्याआधी पॅच टेस्ट करून पाहावे.






