चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग आणि धूळ, माती स्वच्छ करण्यासाठी कोणत्याही केमिकल युक्त फेसवॉशचा वापर करण्याऐवजी पाण्याचा वापर करून त्वचा स्वच्छ करावी. यामुळे चेहऱ्यावर ग्लो येतो.
चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासाठी वाफेच्या पाण्यात संत्र्याची साल आणि बीटची साल घालावी. यामुळे चेहऱ्यावर गुलाबी ग्लो येईल आणि त्वचा अधिक सुंदर होईल. जाणून घ्या वाफ घेण्याचे फायदे.
रात्री झोपण्याआधी चेहऱ्यावर नियमित नाईट क्रीम लावावे. यामुळे त्वचा खूप जास्त उजळदार आणि सुंदर दिसते. बाजारातील महागड्या क्रीम विकत घेण्याऐवजी तुम्ही घरीच नाईट क्रीम तयार करू शकता.
संत्र्याच्या सालींचा वापर करून तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये सीरम तयार करू शकता. संत्र्यामध्ये असलेल्या विटामिन सी मुळे त्वचा खूप जास्त चमकदार आणि ग्लोइंग होते.
डोळ्यांभोवती आलेले काळे डाग, चेहऱ्यावर पुरळ इत्यादी अनेक समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी बटाट्याचा रस आणि गुलाब पाणी एकत्र मिक्स करून चेहऱ्यावर लावावे. यामुळे त्वचा उजळदार दिसेल.
गुलाब पाण्यात असलेल्या घटकांमुळे त्वचा हायड्रेट राहते. याशिवाय थंडीच्या दिवसांमध्ये चेहऱ्यावरील कमी झालेली चमक वाढवण्यासाठी गुलाब पाणी आणि इतर पदार्थांचा वापर करावा.
तुळशीच्या पानांमध्ये असलेले गुणकारी घटक त्वचेवर वाढलेले पिंपल्स कमी करण्यासाठी मदत करतात. तुळशीच्या पानांचा स्प्रे नियमित चेहऱ्यावर मारल्यास त्वचा हेल्दी राहील.
थंडीच्या दिवसांमध्ये त्वचा खूप जास्त कोरडी होऊन जाते. अशावेळी त्वचेची काळजी घेण्यासाठी खोबऱ्याच्या तेलात तूप मिक्स करून लावल्यास त्वचा हायड्रेट आणि मुलायम होण्यास मदत होईल.
त्वचेवर जमा होणारे अतिरिक्त तेल कमी करण्यासाठी मुलतानी मातीचा वापर करावा. यामध्ये असलेले नैसर्गिक घटक त्वचा आतून स्वच्छ करतात आणि चेहऱ्यावरील डाग कमी करण्यास मदत करतात.
चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या कमी करण्यासाठी बाजारातील स्किन केअरचा वापर न करता घरगुती पदार्थांचे सेवन करावे. अन्नपदार्थांचा थेट परिणाम शरीरावर दिसून येतो.
त्वचेसंबंधित वाढू लागलेल्या समस्या कमी करण्यासाठी घरगुती पदार्थांच्या सेवनासोबत भरपूर पाण्याचे सेवन करावे. स्किन केअर प्रॉडक्टमध्ये नैसर्गिक पदार्थांचा वापर करावा.
बेसन पिठात गुलाब पाणी आणि कॉफी इत्यादी पदार्थ मिक्स करून लावल्यास चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग कमी होईल आणि त्वचा चमकदार दिसेल. जाणून घ्या बेसन फेसपॅक बनवण्याची कृती.
चेहऱ्यावर आलेले पिंपल्सचे काळे डाग घालवण्यासाठी संत्र्याच्या सालीचा फेसपॅक बनवून चेहऱ्यावर लावावा. यामुळे त्वचा खूप जास्त हायड्रेट आणि सुंदर दिसते. जाणून घ्या संत्र्याच्या सालीचा फेसपॅक बनवण्याची कृती.
थंडीत चेहऱ्यावर वाढलेला कोरडेपणा कमी करण्यासाठी पपईच्या सालींपासून बनवलेले फेसपॅक चेहऱ्यावर लावावा. यामुळे त्वचा हायड्रेट राहते आणि त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारते.
थंडीच्या दिवसांमध्ये चेहऱ्यावर वाढलेल्या सुरकुत्या आणि कोरडेपणा कमी करण्यासाठी वेगवेगळा तेलाने चेहऱ्यावर मसाज करावा. यामुळे त्वचा खूप जास्त चमकदार आणि फ्रेश दिसते. जाणून घ्या सविस्तर.
सकाळी उठल्यानंतर नियमित डिटॉक्स पेयांचे सेवन केल्यास शरीराला भरमसाट फायदे होतात. याशिवाय त्वचेवरील चमक वाढवण्यासाठी आणि पचनक्रिया सुधारण्यासाठी डिटॉक्स पेयांचे सेवन करावे.
राज्यासह संपूर्ण देशभरात कडाक्याची थंडी पडली आहे. थंडीच्या दिवसांमध्ये शरीराला पोषक घटकांची खूप जास्त आवश्यकता असते. कारण वारंवार सर्दी, खोकला, ताप इत्यादी साथीच्या आजारांमुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते. रोगप्रतिकारशक्ती…
चेहऱ्यावर जमा झालेली डेड स्किन कमी करण्यासाठी टोमॅटोचा वापर करावा. टोमॅटोमध्ये असलेले विटामिन सी आणि इत्यादी अनेक घटक त्वचा स्वच्छ करतात. जाणून घ्या टोमॅटो फेसपॅक बनवण्याची कृती.