Skin Care Tips: पिंपल्सने भरलेला चेहरा आठवडाभरात होईल स्वच्छ! त्वचेची काळजी घेण्यासाठी 'या' हिरव्या पावडरचा करा वापर
Skin Care Tips: धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, आहारात सतत होणारे बदल, प्रदुषित वातावरण इत्यादी अनेक गोष्टींच्या परिणामांमुळे अकाली केस पांढरे होणे, टक्कल पडणे, केसांत कोंडा होणे, चेहऱ्यावर वारंवार पिंपल्स, काळे डाग येणे, सुरकुत्या इत्यादी अनेक समस्या वाढू लागतात. त्वचेच्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी महिला बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या केमिकल्सयुक्त स्किन केअरचा वापर करतात. पण रासायनिक ब्यूटी प्रॉडक्ट्समध्ये असलेले घटक त्वचेचे नुकसान करतात आणि चेहऱ्यावरील चमक नाहीशी करून टाकतात. वांरवांर चेहऱ्यावर पिंपल्स किंवा काळे डाग येत असतील तर अजिबात दु्र्लक्ष न करता डाॅक्टरांच्या सल्ल्याने वेळीच उपचार करणे फार आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावर आलेले पिंपल्स आणि काळे डाग करण्यासाठी आयुर्वेदातील हिरव्या पावडरचा वापर कशा पद्धतीने करावा, याबद्द्ल जाणून घेऊया सविस्तर माहिती. (फोटो सौजन्य – istock)
कडुनिंबाच्या पानांचा वापर केल्यामुळे त्वचेच्या समस्यांपासून सुटका मिळते आणि चेहऱ्यावरील हरवलेली ग्लो पुन्हा परत मिळण्यास मदत होते. यामध्ये नैसर्गिक औषधी गुणधर्म, अँटी-बॅक्टीरियल आणि अँटी-फंगल घटक असतात. त्यामुळे कडुलिंब आणि कढीपत्त्याचा पांनाचा वापर त्वचा आणि केसांसाठी करू शकता. त्वचा आणि केसांचे आरोग्य निरोगी ठेवण्यास कायमच घरगुती पदार्थांचा वापर करावा, ज्यामुळे त्वचेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते. या दोन्ही पानांपासून घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने पावडर तयार करून त्वचेवर लावू शकता.
हिरवी पावडर तयार करण्यासाठी सर्वप्रथम कडुनिंबाची पाने आणि कढीपत्त्याची पाने पाण्याने स्वच्छ करून घ्या. स्वच्छ करून घेतलेली पाने कपड्यावर किंवा ताटात पसरवून हवेशीर ठिकाणी सुकण्यासाठी ठेवा. २ दिवस उन्हामध्ये सुकल्यानंतर पाने पूर्णपणे कुरकुरीत होतील. पूर्णपणे कुरकुरीत सुकलेली पाने मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक वाटून पावडर तयार करा. तयार केलेली पावडर कोरड्या एअरटाइट कंटेनरमध्ये भरून ठेवा. पावडर काढण्यासाठी कोरड्या चमचाचाच वापर करावा, जेणेकरून पावडर जास्त दिवस व्यवस्थित टिकून राहील.
Lifestyle News: रात्री झोपण्याआधी मिठावर पाय का घासतात? नेमकं कारण जाणून तुम्हीही व्हाल थक्क!
चेहऱ्यावरील पिंपल्स आणि डाग कमी करण्यासाठी वाटीमध्ये तयार केलेली हिरवा पावडर घेऊन त्यात दही किंवा गुलाबपाणी घालून पेस्ट तयार करा. तयार केलेला फेसपॅक चेहऱ्यावर हलक्या हाताने लावा आणि १५ मिनिट तसाच ठेवून द्या. त्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धूवुन घ्या. कोणतााही फेसपॅक लावण्याआधी पॅच टेस्ट करणे आवश्यक आहे. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा फेसपॅक लावल्यास त्वचेच्या समस्या कमी होण्यास मदत होईल.






