थंडीच्या दिवसांमध्ये फिट राहण्यसाठी १५ मिनिटांमध्ये झटपट बनवा टेस्टी आवळ्याचा मुरंबा, नोट करून घ्या रेसिपी

Amla Muramba Recipe: हिवाळ्यात शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आवळा खावा. आवळा खाल्ल्यामुळे शरीराला आणि केसांना खूप जास्त फायदे होतात. त्यामुळे आवळ्यापासून बनवलेला मुरंबा नक्कीच बनवून पहा. (फोटो सौजन्य – pinterest)
१५ मिनिटांमध्ये झटपट बनवा टेस्टी आवळ्याचा मुरंबा
१५ मिनिटांमध्ये झटपट बनवा टेस्टी आवळ्याचा मुरंबा
Published on: 
Updated on: 

हिवाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर बाजारात वेगवेगळे पारंपरिक पदार्थ उपलब्ध होतात. त्यामध्ये आवळा, वेगवेगळ्या पालेभाज्या सुद्धा उपलब्ध होतात. दैनंदिन आहारात आवळ्याचे आवर्जून सेवन करावे. आवळा खाल्ल्यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते आणि शरीराला सुद्धा फायदे होतात. थंडीच्या दिवसांमध्ये आवळ्याला खूप जास्त मागणी असते. आवळ्यापासून कँडी, ज्यूस किंवा आवळा सुपारी बनवली जाते. पण आज आम्ही तुम्हाला वर्षभर टिकून राहणारा आवळ्याचा मुरंबा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेला मुरंबा वर्षभर व्यवस्थित टिकून राहतो आणि चव सुद्धा मस्त लागते. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात लोह, विटामिन सी असते, ज्यामुळे शरीराची कमकुवत झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते. त्यामुळे पाकात मुरलेला एक आवळा नियमित खाल्ल्यास केसांचे आरोग्य सुद्धा चांगले राहील. चला तर जाणून घेऊया आवळ्याचा मुरंबा बनवण्याची सोपी रेसिपी.

साहित्य:

  • आवळा

  • गूळ

  • लवंग

  • पाणी

  • वेलची पावडर

  • मीठ

कृती:

  • आवळ्याचा मुरंबा बनवण्यासाठी सर्वप्रथम, आवळे पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर आवळे कोरडे करा. काट्याच्या चमच्याने आवळ्यांना टोचे मारा.

  • कढईमध्ये स्वच्छ करून घेतलेले आवळे, गूळ आणि पाणी एकत्र मिक्स करा. त्यानंतर गॅसवर कढई ठेवून शिजवून घ्या.

  • गूळाच्या पाकामध्ये आवळे छान शिजून निघतील. पाकामध्ये आवळे अर्धवट शिजल्यानंतर त्यानंतर वेलची पावडर घालून मिक्स करा आणि मंद आचेवर शिजण्यासाठी ठेवा.

  • आवळे मऊ झाल्यानंतर गॅस बंद करा आणि थंड होण्यासाठी ठेवा. थंड झालेले मिश्रण हवा बंद डब्यात भरून ठेवा, जेणेकरून आवळे खराब होणार नाहीत.

  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला आवळ्याचा चविष्ट मुरंबा. हा पदार्थ घरातील सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.