(फोटो सौजन्य: Pinterest)
भोपळमध्ये वाढत आहे ‘ब्लड किक’ नावाचा धोकादायक ट्रेंड, स्वतःचंच रक्त काढून तरुण होतायेत ‘रिलॅक्स’
झाडांसाठी खत
तुमच्या घरात तुम्ही लाहान झाड किंवा रोप लावलं असेल तर त्यात तुम्ही आंब्याच्या सालीचा वापर करु शकता. ते रोपांसाठी एका किटकनाशकासारखे काम करते. चहा बनवल्यानंतर आंब्याच्या सालीची पेस्ट वापरेलेल्या चहाच्या पावडरमध्ये मिसळा. पाण्यात वापरलेली चहा पावडर आणि आंब्याची साल साठवून ठेवा. काही दिवसांनी याचे खत तयार होईल जे तुम्ही तुमच्या रोपांसाठी वापरु शकता. हे खत मातीत मिसळा आणि तुमच्या झाडांना किटकांपासून वाचवा.
आंब्याचा चहा
तुम्ही मँगो ज्यूस तर अनेकदा पिला असेल पण तुम्ही कधी मँगो टी ट्राय केली आहे का? सालीचा पुर्नवापर करुन तुम्ही आंब्याचा चहा देखील तयार करु शकता. यामुळे चहाला एक वेगळी चव मिळते. यासाठी एका पातेल्यात पाणी घ्या, त्यात आंब्याच्या साली टाका आणि उकळी येऊ द्या. तयार पाणी गाळून एका कपात टाका आणि तुमचा मँगो टी तयार आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यात मध देखील घालू शकता.
आंब्याच्या सालीचे चिप्स
हलक्या-फुलक्या भुकेला शमवण्यासाठी तुम्ही आंब्याच्या सालीचा वापर करु शकता. यासाठी आंब्याची साल काढल्यानंतर, ती उन्हात कडक सुकवून घ्या. आता सुकलेल्या या आंब्यांच्या सालीला गरमागरम तेलात काही मिनिटे तळा. तळलेले हे चिप्स एका प्लेटीत काढून त्यावर मीठ शिंपडा आणि संध्याकाळच्या नाश्त्यासाठी हे मँगो चिप्स खाण्यासाठी सर्व्ह करा.
एकाच महिन्यात दोन वेळा मासिक पाळी येते? महिलांच्या शरीरात होणाऱ्या ‘या’ बदलांमुळे बिघडते आरोग्य
त्वचेसाठी फायदेशीर
आपल्या त्वचेचे साैंदर्य वाढवण्यासाठीही तुम्ही आंब्याच्या सालीचा वापर करु शकता. आंब्याच्या सालीमध्ये पॉलीफेनॉल आणि कॅरोटीनॉइड्ससारखे अँटीऑक्सिडंट्स असतात, जे आपल्या त्वचेचे संरक्षण करण्यास मदत करतात. सूर्याच्या अतिनील किरणांपासून संरक्षण करण्यासाठी याची मोठी मदत होते. तुम्ही आंब्याची ही साल त्वचेवर चोळू शकता. यामुळे त्वचा उजळ होण्यासही मदत होऊ शकते. तथापि, त्वचेवर कोणताही नवा उपाय करताना पॅच टेस्ट करणं अनिवार्य आहे हे लक्षात ठेवा.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.






