वास्तूशास्त्राचा आपल्या जीवनावर खूप परिणाम होत असतो. हे तुम्हीही अनेकदा ऐकलं असेलच. याचप्रमाणे आपल्या काही सवयी किंवा घरातील वस्तूंची चुकीची मांडणीही आपल्यावर परिणाम करत असते. अनेकदा आपली प्रगती कुठेतरी खुंटल्यासारखी वाटते. तर आर्थिक चनचनीलाही सामोरं जावं लागतं. सर्वकाही असतानाही आर्थिक संकट हे येतच. यामागेही कारणं असू शकतात.
नशिबाला दोष देण्यापेक्षा आपल्या घरात ही एक वस्तू आहे का नक्की तपासा जर आपल्या घरात ही एक वस्तू असेल तर आपल्या आर्थिक चनचनीला हेच कारण कारणीभूत आहे.
अनेक घरांमध्ये जुने मळलेले किंवा २-३ दिवस वापरलेले कपडे आठवडाभर तसेच साठवून ठेवले जातात, नंतर ते एकत्र धुतले जातात थोडक्यात दररोज कपड़े धूण्याचा कंटाळा केला जातो. लक्षात घ्या जे कपडे घालून आपण इकडे तिकडे वावरतो त्या कपड्यांवर मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा साठलेली असते.
अनेकांना उशिरा अंघोळ करण्याची सवय असते ज्या घरातील लोक सकाळी लवकर आंघोळ करून देव पूजा करतात त्या घरात दरिद्रता कधीच नांदत नाही. जे सकाळी उठून लवकर आंघोळ करतात आणि देवाचे स्मरण करतात त्या घरात लक्ष्मी सातत्याने वाढत राहते.
(वरील माहिती धार्मिक मान्यतेनुसार देण्यात आलेली आहे. याचा अंधश्रध्येही काहीही संबंध नाही.)