अंडाशयात एकाच गाठीमध्ये दोन दुर्मीळ कर्करोग! मुंबईतील डॉक्टरांनी नोंदवले वैद्यकीय साहित्यातील पहिले प्रकरण
अंडाशयातील एका गाठीमध्ये एकाच वेळी दोन अत्यंत दुर्मीळ प्रकारचे कर्करोग आढळल्याचा वैद्यकीय साहित्यातील पहिला नोंदवलेला प्रकार मुंबईतील डॉक्टरांनी समोर आणला आहे. ५५, वर्षीय रजोनिवृत्त महिलेच्या उजव्या अंडाशयातील तब्बल २७ सेंमीच्या गाठीची सूक्ष्म तपासणी केली असता, मॅच्युअर सिस्टिक टेराटोमामधून निर्माण झालेला’ पॅपिलरी थायरॉईड कॅरिसिनोमा आणि त्याच गाठीमध्ये ओव्हेरियन क्लिअर सेल कॅरिसिनोमा आढळून आला.(फोटो सौजन्य – istock)
या दुर्मीळ प्रकरणाचा अहवाल ‘इंटरनॅशनल जर्नल ऑफ क्लिनिकल ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनॅकोलॉजी’ या वैद्यकीय नियतकालिकात ‘अ टेल ऑफ रेअर कोएक्झिस्टन्स इन ओव्हरी पॅपिलरी थायरॉईड कॅरिसिनोमा अरायझिंग फ्रॉम अ मॅच्युअर ओव्हेरियन टेराटोमा विथ क्लिअर सेल कॅरिसिनोमा’ या शीर्षकाखाली प्रकाशित झाला आहे. या संशोधनात कामा रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक सहयोगी प्राध्यापक डॉ. तुषार पालवे, डॉ. अश्विनी नाटेकर, डॉ. राधिका के. आणि डॉ. अश्विनी यांचा सहभाग आहे.या प्रकरणामुळे रजोनिवृत्तीनंतर अंडाशयात आढळणारी मोठी गाठ केवळ सौम्य टेराटोमा समजून न घेता तिची अत्यंत बारकाईने आणि सविस्तर हिस्टोपॅथॉलॉजिकल तपासणी करणे किती महत्त्वाचे आहे, याकडे वैद्यकीय क्षेत्राचे लक्ष वेधले गेले आहे.
८८ अंडाशयातील एवढ्या मोठ्या गाठीमध्ये दोन स्वतंत्र आणि अत्यंत दुर्मीळ कर्करोग एकाच वेळी आढळणे हे वैद्यकीयदृष्ट्या अत्यंत असामान्य आहे. या प्रकरणाचे वैशिष्ट्य म्हणजे मॅच्युअर सिस्टिक टेराटोमामधून पॅपिलरी थायरॉईड कॅरिसिनोमा विकसित होणे आणि त्याच गाठीमध्ये क्लिअर सेल कॅरिसिनोमा आढळणे, योग्य वेळी निदान झाल्यास अशा दुर्मीळ कर्करोगांवर प्रभावी उपचार करणे शक्य होते, अशी माहिती – डॉ. तुषार पालवे, वैद्यकीय अधीक्षक, कामा अॅड दिली आहे.
शुगर कंट्रोलमध्ये ठेवायची? आहारात ‘या’ फळांचा करा समावेश; डायबिटीजच्या रुग्णांसाठी ठरेल फायदेशीर
रुग्णाला दोन महिन्यांपासून पोटदुखी आणि पोटात गाठ जाणवत होती. एमआरआय तपासणीत उजव्या अंडाशयाच्या भागात २६.५ × २३.६ × १५.६ सेंमी आकाराची मोठी सॉलिड सिस्टिक गाठ दिसून आली. विशेष म्हणजे सीए-१२५ ही चाचणी सामान्य होती. शस्त्रक्रियेदरम्यान गाठ काढून तिची सविस्तर हिस्टोपॅथॉलॉजिकल तपासणी करण्यात आली. याच तपासणीत दोन स्वतंत्र कर्करोगांचे अस्तित्व उघड झाले. मॅच्युअर सिस्टिक टेराटोमामध्ये कर्करोगाचे रूपांतर अत्यंत दुर्मीळ असून, त्याचे प्रमाण साधारण एक ते तीन टक्के इतके असते. अशा गाठींमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग स्क्वामस सेल कॅरिसिनोमा असतो. मात्र, त्यातून पेंपिलरी थायरॉईड कॅरिसिनोमा विकसित होणे अत्यंत असामान्य आहे. या रुग्णामध्ये कर्करोग अंडाशयापुरताच मर्यादित असल्याचे आढळले.
Ans: हे अत्यंत दुर्मीळ असले तरी काही विशिष्ट परिस्थितींमध्ये एकाच अंडाशयातील गाठीमध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारच्या कर्करोगाच्या पेशी आढळू शकतात.
Ans: पोट फुगणे, ओटीपोटात किंवा पाठीच्या खालच्या भागात दुखणे, लवकर पोट भरणे, वारंवार लघवी होणे किंवा मासिक पाळीत असामान्य बदल अशी लक्षणे दिसू शकतात. मात्र ही लक्षणे इतर कारणांमुळेही होऊ शकतात.
Ans: नाही. अंडाशयातील अनेक गाठी सौम्य (कॅन्सर नसलेल्या) असू शकतात. गाठ नेमकी कोणत्या प्रकारची आहे हे तपासण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने आवश्यक चाचण्या आणि पॅथॉलॉजी तपासणी केली जाते.






