(फोटो सौजन्य: Pinterest)
लेह-लडाख
जम्मू-काश्मीरच्या पूर्वेला, हिमालय पर्वतरांगेत हे ठिकाण वसले आहे. निसर्गप्रेमी आणि साहस प्रमींसाठी हे ठिकाण सर्वोत्तम मानले जाते. लडाखची जास्त उंची आणि कमी ऑक्सिजन पातळी सहन करण्यासाठी आपली शारीरिक क्षमता उत्तम असणे गरजेचे आहे. ज्यामुळे हे ठिकाण तरुणांसाठी परफेक्ट ठरते. जून ते सप्टेंबरचा काळ ठिकाणाला भेट देण्यासाठी परफेक्ट काळ मानला जातो.
स्पिती व्हॅली
स्पिती व्हॅली हे ठिकाण एक थंड वाळवंट म्हणून ओळखले जाते. वयाच्या तिशीआधी तुम्ही या ठिकाणाला भेट देऊ शकता. तिबेट आणि भारत यांच्यातील “मध्यभूमी” म्हणून ठिकाणाची ओळख आहे. शहराच्या गजबटापासून दूर इथे तुम्हाला स्वत:साठी वेळ काढता येईल. हे ठिकाण प्राचीन बौद्ध मठ, बर्फाच्छादित शिखरे, निळे आकाश आणि निवांत वातावरण यासाठी प्रसिद्ध आहे.
दार्जिलिंग
चहाच्या मळ्यांसाठी लोकप्रिय असलेले हे ठिकाण पश्चिम बंगालमधील हिमालयाच्या कुशीत वसलेले आहे. चहाच्या मळ्यांमध्ये मैलोंमैल चालण्यासाठी तुमची शारीरिक क्षमता उत्तम असणे फार गरजेचे असते, ज्यामुळे तुमचे वय प्रवासात महत्त्वाची भूमिका बजावेल. इथले आल्हाददायक हवामान मनाला वेगळेच सुख देऊन जाते.
पाँडिचेरी
भारताच्या दक्षिण-पूर्व किनारपट्टीवरील एक केंद्रशासित प्रदेश आणि प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून पाँडिचेरीची ओळख आहे. इथे सर्किंग आणि स्कूबा डायव्हिंगचा आनंद घेता येतो. इथे तुम्ही अनेक एक्टिव्हिटीजचा आनंद घेत आपल्या ट्रीपचा आनंद द्विगुणित करु शकता. फ्रेंच वसाहतकालीन इतिहास, संस्कृती आणि सुंदर समुद्रकिनाऱ्यांसाठी हे ठिकाण फार लोकप्रिय आहे.
Water Of Tears : देशातील या तलावाला ‘अश्रूंचं तलाव’ का म्हटल जात? कुठे वसलं आहे ते जाणून घ्या
मेघालय
मेघालय हे ईशान्य भारतातील एक डोंगराळ ढगांचे निवासस्थान म्हणून याला ओळखले जाते, कारण इथे जगातील सर्वाधिक पाऊस पडतो. इथे तुम्ही बांबू ट्रेक आणि खोल गुहांचा शोध घेऊ शकता. नैसर्गिक सौंदर्य, धबधबे आणि साहसी पर्यटनासाठी हे ठिकाण पर्यटकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे.






