Winter fashion: हिवाळ्यात कपडे खरेदी करताना निवडा हे ७ खास फॅब्रिक्स; लोकरीपासून फ्लिसपर्यंत जाणून घ्या कापडांचे प्रकार!

Winter fashion: हिवाळ्यात कपडे खरेदी करताना केवळ फॅशन नव्हे, तर कापडाची गुणवत्ता आणि उबदारपणाही महत्त्वाचा असतो. वूलन, काश्मिरी, फ्लिस, वेल्वेट, कॉरडरॉय, फ्लॅनेल आणि थर्मल अशा ७ खास फॅब्रिक्सचे प्रकार, त्यांची वैशिष्ट्ये आणि योग्य कापड निवडण्याच्या टिप्स जाणून घ्या.
When shopping for clothes in winter, choose these 7 special fabrics(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
When shopping for clothes in winter, choose these 7 special fabrics(फोटो सौजन्य - सोशल मीडिया) When shopping for clothes in winter, choose these 7 special fabrics(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
Published on: 
Updated on: 
  • हिवाळ्यात शरीर उबदार ठेवण्यासाठी वूलन, काश्मिरी, फ्लिस, वेल्वेट, कॉरडरॉय, फ्लॅनेल आणि थर्मल अशा ७ प्रकारच्या फॅब्रिक्सची निवड करू शकता.

  • प्रत्येक फॅब्रिकची खासियत वेगळी असून काही कापडे उबदारपणा देतात, तर काही मऊपणा, आराम आणि आकर्षक लूकसाठी लोकप्रिय आहेत.

  • हिवाळ्यात कपडे खरेदी करताना कापडाची गुणवत्ता, जाडी, आरामदायीपणा आणि धुण्याच्या सूचना लक्षात घेऊन योग्य फॅब्रिक निवडा.

हिवाळ्याला सुरुवात झाली की कपड्यांच्या वॉर्डरोबमध्ये बदल होऊ लागतो.त्यामध्ये आपण अधिक उब देणारे कापड वापरू लागतो. थंडीपासून बचाव करण्यासाठी स्वेटर, जॅकेट, कोट आणि शाल यांसारख्या कपड्यांना पसंती दिली जाते.त्यामध्ये देखील विविध प्रकारचे कापड उपलब्ध असते. मात्र, हिवाळ्यात कपडे खरेदी करताना त्यांचा रंग, डिझाइन किंवा फॅशन पाहण्यासोबतच ते कोणत्या कापडापासून तयार केले आहेत, हे जाणून घेणेही महत्त्वाचे आहे. कारण प्रत्येक फॅब्रिकची स्वतःची वेगळी खासियत असते. काही कापडे शरीरातील उष्णता टिकवून ठेवतात, तर काही मऊ आणि आरामदायी असतात.सर्वच कापड हे थंडावरती उत्तम उपाय असेल असे नाही. जाणून घेऊया हिवाळ्यात वापरता येणाऱ्या ७ खास फॅब्रिक्सबद्दल.

१. वूलन फॅब्रिक (Wool Fabric)

हिवाळ्यात सर्वाधिक वापरले जाणारे कापड म्हणजे वूलन. हे प्रामुख्याने मेंढीच्या लोकरीपासून तयार केले जाते.चांगल्या प्रकारचे उल थंडीपासून उत्तमरित्या बचाव करते. शरीरातील उष्णता टिकवून ठेवण्यास मदत करत असल्यामुळे स्वेटर, शाल, मफलर, टोपी आणि कोट तयार करण्यासाठी याचा वापर केला जातो. ज्यामुळे ते कापड आपल्या शरीराला अराम आणि उब देते.

२. काश्मिरी फॅब्रिक (Cashmere Fabric)

काश्मिरी कापड अतिशय मऊ, हलके आणि उबदार असते. हे काश्मिरी शेळ्यांच्या मऊ आतील लोकरीपासून तयार केले जाते.त्यामुळे हे दिसायला देखील सुंदर आणि वापरायला आरामदायी असते. यापासून आकर्षक शाल, स्कार्फ आणि स्वेटर बनवले जातात. आरामदायी आणि प्रीमियम लूकसाठी हे कापड लोकप्रिय आहे.

३. फ्लिस फॅब्रिक (Fleece Fabric)

फ्लिस हे प्रामुख्याने पॉलिस्टरपासून तयार केलेले मऊ आणि हलके कापड आहे. शरीराची उष्णता टिकवून ठेवण्यास मदत करणारे हे कापड हुडी, जॅकेट, ब्लँकेट आणि ट्रॅकसूट तयार करण्यासाठी वापरले जाते.याचा उपयोग नवीन प्रकारच्या कापडांमध्ये जास्त दिसून येतो.

४. वेल्वेट फॅब्रिक (Velvet Fabric)

वेल्वेट म्हणजेच मखमली कापड. या कापडाचा पृष्ठभाग मऊ आणि चमकदार असतो.ह्या कापडाला एक वेगळीच सुंदरता असते. त्याच्या वेलवेट कापड मुले ते चमकतंय असे वाटते. हिवाळ्यात पार्टीवेअर ड्रेस, कुर्ती, ब्लेझर आणि जॅकेटसाठी याचा वापर केला जातो. यामुळे कपड्यांना आकर्षक आणि रॉयल लूक मिळतो.

५. कॉरडरॉय फॅब्रिक (Corduroy Fabric)

कॉरडरॉय कापडाच्या पृष्ठभागावर उभ्या रेषांसारख्या पट्ट्या असतात. हे कापड जाड, मऊ आणि टिकाऊ असते. हिवाळ्यात कॉरडरॉय पँट, शर्ट, जॅकेट आणि स्कर्ट वापरता येतात.याचा वापर हा रोजच्या वापरण्याचा कपड्यांमध्ये देखील केला जाऊ शकतो.

६. फ्लॅनेल फॅब्रिक (Flannel Fabric)

फ्लॅनेल हे मऊ आणि आरामदायी कापड आहे. ते कापूस किंवा लोकरीपासून तयार केले जाते. या कापडापासून शर्ट, नाईटवेअर, चादरी आणि ब्लँकेट तयार केले जातात. विशेषतः थंड वातावरणात फ्लॅनेलचे कपडे आरामदायी ठरतात.साधारण ब्लॅंकेट बनवण्यासाठी त्याचा वापर जास्त केला जातो.

७. थर्मल फॅब्रिक (Thermal Fabric)

थर्मल फॅब्रिकचा वापर प्रामुख्याने शरीर उबदार ठेवण्यासाठी केला जातो. या कापडापासून तयार केलेले कपडे शरीराच्या जवळ बसतात आणि उष्णता टिकवून ठेवण्यास मदत करतात. थर्मल टॉप, लेगिंग्ज आणि इनरवेअर यामध्ये या कापडाचा वापर केला जातो.ह्या कापडाचा वापर हा इनर वेअर बनवण्यासाठी जास्त होतो.

कापड निवडताना कोणती काळजी घ्यावी?

हिवाळ्यात कपडे खरेदी करताना कापडाची गुणवत्ता, जाडी आणि आरामदायीपणा तपासावा. तसेच कपडे धुण्याच्या सूचना वाचाव्यात. आपल्या परिसरातील थंडी आणि दैनंदिन वापर लक्षात घेऊन योग्य फॅब्रिक निवडल्यास हिवाळ्यात स्टायलिश दिसण्यासोबत शरीरही उबदार ठेवता येते.