एका जागी पुतळा बनवणारे Zombie Drug नेमके आले कुठून? तरुणाईला वेड लावलेल्या झॉम्बी ड्रग्जचे शरीरावर होतात घातक परिणाम
झॉम्बी ड्रग्ज म्हणजे काय?
झॉम्बी ड्रग्जचे शरीरावर होणारे परिणाम?
झॉम्बी ड्रग्जचा वापर कशासाठी केला जातो?
राज्यासह संपूर्ण देशभरात मागील काही दिवसांपासून ड्रग्जच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली आहे. बेंगरूळ, चंदीगड आणि त्यानंतर आता भारतातसुद्धा झॉम्बी ड्रग्ज घेणाऱ्या तरुणांचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहेत. एका जागेवर पुतळ्या सारखे शांतपणे उभे राहणे किंवा रक्ताने माखलेल्या स्थितीमध्ये अंगावर धावून जाणे ही स्थिती ‘झायलाझिन’ म्हणजे जगभरात फेमस असलेल्या झॉम्बी ड्रग्ज’ च्या सेवनामुळे उद्भवते. देशभरातील तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर ड्रग्जच्या आहारी जात असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. शरीरासाठी अतिशय घातक असलेले झॉम्बी ड्रग्ज घेतलेली व्यक्ती एका जागेवर तासनतास स्तब्ध उभी राहते. चला तर जाणून घेऊया Zombie Drug नेमके आले कुठून? झॉम्बी ड्रग्जचे शरीरावर कोणते परिणाम होतात, याबद्दल सविस्तर माहिती.(फोटो सौजन्य – istock)
मानवासाठी झॉम्बी ड्रग्ज अतिशय घातक मानला जातो. कारण प्राण्यांना भूल देण्यासाठी झॉम्बी ड्रग्जची निमिर्ती करण्यात आली आहे. परंतु प्राण्यांसाठी तयार करण्यात आलेल्या ड्रग्जचे सेवन मानवाने केल्यानंतर शरीरावर अतिशय गंभीर परिणाम दिसू लागतात. झायलजीन प्राण्यांना भूल देण्यासाठी किंवा अस्वस्थ प्राण्यांना शांत करण्यासाठी वापरले जाते. औषध वेदनांमधील संवेदना कमी करण्यासाठी वापरले जाते. तसेच हे औषध non-opioid ड्रग्ज आहे, जे अफीमपासून तयार केले जात नाही. भारतातील सुमारे ५.७ कोटी लोक ओपिओइड्स आणि हेरॉईनसारख्या अंमली पदार्थांचे सेवन करतात. तर इतर ४ कोटी विविध अमली पदार्थांचा वापर नशा करण्यासाठी वापरतात. मानवी हाडांपासून बनवलेले घातक ड्रग्ज शरीरासाठी जीवघेणे ठरते. झॉम्बी ड्रग्जचा उगम अमेरिकेमध्ये झाला आणि त्यानंतर काही दिवसांमध्ये चंदीगड, बिहार आणि बेंगळुरूमध्ये झॉम्बी ड्रग्जचे सेवन करणे लोक आढळून आले आहेत.
झॉम्बीसारख्या घातक ड्रग्जचे सेवन केल्यामुळे मानवी शरीरावर खोल आणि अल्सरसारख्या घातक जखमा होतात. हे ड्रग्ज शरीरासाठी धोकादायक मानले जाते. याच्या जखमा लवकर बऱ्या होत नाहीत. सुरुवातीच्या दिवसांमध्ये शरीरावर झालेल्या जखमा कालांतराने सडू लागतात. तसेच शरीरात संसर्ग वाढल्यामुळे जखम झालेला अवयव कापून टाकावा लागतो.
झॉम्बी ड्रग्जच्या अतिसेवनामुळे किंवा पहिल्यांदा ड्रग्ज घेतल्यानंतर थेट मेंदूवर परिणाम होतो. मध्यवर्ती मज्जासंस्थेला इतके शिथिल करते की ज्यामुळे श्वास घेणे आणि सोडणे खूप जास्त कठीण होऊन जाते. श्वासाच्या गतीवर परिणाम झाल्यामुळे मृत्यू होण्याची जास्त शक्यता असते. यामुळे शरीराचा रक्तदाब कमी होऊन हृदयाच्या ठोक्यांचा वेग सुद्धा कमी होतो. वारंवार ड्रग्जचे सेवन केल्यास यकृत आणि मूत्रपिंड कायमचे निकामी होते.
कच्चा कोबी खाल्ल्यास मेंदूत जातात किडे? इन्फेक्शन आणि गैरसमजामागील तथ्य
झॉम्बी ड्रग्जचे सेवन केल्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होतात. ड्रग्ज घेतलेली व्यक्ती एका जागेवर तासनतास पुतळ्या सारख्या स्थितीमध्ये उभी राहते. तीव्र मतिभ्रम, गोंधळलेली अवस्था, स्मरणशक्ती कमी होणे यांसारखी गंभीर लक्षणे दिसू लागतात. तर वारंवार ड्रग्ज घेतल्यास शरीरातील सर्व अवयव निकामी होऊन मृत्यू होऊ शकतो. झायलाझिन हे ड्रग्ज प्राण्यांना बेशुद्ध करण्यासाठी आणि गुंगी देण्यासाठी वापरले जाते.
Ans: झॉम्बी ड्रग हा अत्यंत घातक सिंथेटिक पदार्थ असून, तो मेंदू आणि शरीरावर गंभीर परिणाम करतो. यामुळे व्यक्ती सुस्त, बधीर आणि नियंत्रणाबाहेर जाते.
Ans: त्वचेवर जखमा, बेशुद्धावस्था, श्वसन मंदावणे, मानसिक गोंधळ आणि शरीराचा ताबा सुटणे असे गंभीर परिणाम दिसतात.
Ans: स्वस्तात उपलब्धता, चुकीची माहिती आणि उत्सुकता यामुळे तरुण याकडे आकर्षित होत आहेत.






