आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध आहेत कडुलिंबाची पाने! शक्तिशाली पानांचे त्वचा केसांसह संपूर्ण शरीराला होतील भरमसाट फायदे
कडुलिंबाच्या पानांचे फायदे?
कडुलिंबाची पाने कशा पद्धतीने खावी?
पचनक्रिया सुधारण्यासाठी उपाय?
धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता, कमी पाण्याचे सेवन इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शारीरिक आरोग्यावर लगेच दिसून येतो. शरीरात निर्माण झालेली पोषक घटकांची कमतरता आरोग्य पूर्णपणे बिघडून टाकते. त्यामुळे संपूर्ण शरीराची योग्य काळजी घेणे फार आवश्यक आहे. कोणत्याही गंभीर आजाराची लागण झाल्यानंतर पूर्वीच्या काळी जास्त डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे आयुर्वेदातील घरगुती उपाय केले जात होते. आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या पदार्थांचे सेवन केल्यानंतर आजार मुळांपासून बरा होतो, अशी मान्यता अजूनही आहे. त्यातील शक्तिशाली पदार्थ म्हणजे कडुलिंबाची पाने. आयुर्वेदामध्ये कडुलिंबाच्या पानांना विशेष महत्व आहे. चला तर जाणून घेऊया कडुलिंबाच्या पानांचे शरीराला होणारे फायदे.(फोटो सौजन्य – istock)
एकाच महिन्यात दोन वेळा मासिक पाळी येते? महिलांच्या शरीरात होणाऱ्या ‘या’ बदलांमुळे बिघडते आरोग्य
कडुलिंबाची पाने सगळीकडे उपलब्ध असतात. बऱ्याचदा पानांच्या कडू चवीमुळे लहान मुलांसह मोठेसुद्धा नाक मुरडतात. पण कडुलिंबाची पाने शरीरासाठी खूप जास्त महत्वाची आहेत. शरीराची कमकुवत झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी या पानांचे सेवन करण्याचा सल्ला कायमच दिला जातो.शरीरात वाढलेला थकवा, अशक्तपणा दूर करण्यासाठी उपाशी पोटी एक किंवा दोन पाने चावून खाल्ल्यास आठवडाभरात फरक दिसून येईल.कडुलिंबाची पाने चावून खाल्ल्यास शरीरात वाढलेल्या आजारांचा धोका कमी होण्यास मदत होते.
दैनंदिन आहारात तिखट, तेलकट किंवा अतिमसालेदार पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराची पचनक्रिया बिघडते. बद्धकोष्ठतेमुळे आतड्यांमधील घाण बाहेर पडून जाण्याऐवजी शरीरात तशीच साचून राहते. ज्याच्या परिणामामुळे संपूर्ण शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. अशावेळी कडुलिंबाची दोन पाने चावून त्यावर कोमट पाणी प्यायल्यास आतड्यांमध्ये जमा झालेली घाण बाहेर पडून जाण्यास मदत होईल आणि शरीर स्वच्छ होईल. संपूर्ण शरीर डिटॉक्स करण्यासाठी कडुलिंबाची पाने खूप जास्त फायदेशीर आहेत.
जगभरात मधुमेहासारख्या गंभीर आजाराने अनेक रुग्ण त्रस्त आहेत. रक्तातील साखरेची पातळी वाढल्यानंतर संपूर्ण आरोग्य बिघडून जाते. यामुळे अचानक चक्कर येणे, थकवा आल्यासारखे वाटणे, जखमा लवकर बऱ्या न होणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात. या सर्व समस्यांपासून कायमचा आराम मिळवण्यासाठी कडुलिंबाची पाने खूप जास्त फायदेशीर ठरतील. कडुलिंबाच्या पानांचा रस किंवा पाने कच्ची चावून खाल्ल्यास शरीरावर सकारात्मक परिणाम दिसून येईल. याशिवाय कॅन्सरच्या घातक पेशी नष्ट करण्यासाठी कडुलिंबाच्या पानांचे सेवन करण्याचा सल्ला कायमच दिला जातो.
कच्चा कोबी खाल्ल्यास मेंदूत जातात किडे? इन्फेक्शन आणि गैरसमजामागील तथ्य
बिघडलेल्या पचनक्रियेमुळे चेहऱ्यावर कायमच मुरूम, मोठे मोठे पिंपल्स आणि फोड येतात. हे फोड बऱ्याचदा लवकर बरे होत नाही. अशावेळी पचनक्रिया सुधारण्यासाठी कडुलिंबाचे पान चावून खावे. तसेच कडुलिंबाच्या पानांचा फेसमास्क किंवा फेसपॅक बनवून चेहऱ्यावर लावल्यास त्वचेवरील ग्लो वाढण्यास मदत होईल आणि चेहरा सुंदर दिसेल.
Ans: कडुलिंबात अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात, जे शरीराला संसर्गांपासून संरक्षण देतात.
Ans: कडुलिंबाची पाने वाटून त्यात हळद किंवा गुलाबपाणी मिसळून फेसपॅक तयार करता येतो.
Ans: मर्यादित प्रमाणात घेतल्यास सुरक्षित आहे, पण जास्त प्रमाण टाळावे.






