Skin Care Tips: सुरकुत्या- पिंपल्स कायमचे होतील गायब! आठवड्यातून दोनदा चेहऱ्यावर लावा जायफळाचा आयुर्वेदिक लेप

Skin Care Tips: चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या, काळे डाग आणि पिंपल्स कमी करण्यासाठी जायफळाचा लेप त्वचेवर लावावा. यामुळे त्वचेवर वाढलेले पिंपल्स आणि टॅन कमी होण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया जायफळ वापरण्याची सोपी पद्धत.
सुरकुत्या- पिंपल्स कायमचे होतील गायब! आठवड्यातून दोनदा चेहऱ्यावर लावा जायफळाचा आयुर्वेदिक लेप
सुरकुत्या- पिंपल्स कायमचे होतील गायब! आठवड्यातून दोनदा चेहऱ्यावर लावा जायफळाचा आयुर्वेदिक लेप
Published on: 
Updated on: 
  • त्वचेवरील काळे डाग घालवण्यासाठी उपाय?

  • त्वचेसाठी जायफळ वापरण्याचे फायदे?

  • टॅनिंग कमी करण्यासाठी काय करावे?

सुंदर आणि डागविरहित त्वचेसाठी महिला कायमच वेगवेगळ्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करत असतात. आरशात पाहिल्यानंतर त्वचेवर आलेले वांग, पिग्मेंटेशन आणि टॅनिंग पाहून काहीजणी खूप जास्त अस्वस्थ होऊन जातात. तरुण वयात त्वचेची गुणवत्ता बिघडल्यानंतर त्वचा खूप निस्तेज दिसू लागते. चेहऱ्यावर सतत येणाऱ्या डागांमुळे त्वचेचा पोत आणि रंग एकसमान न राहता चेहरा काळवंडल्यासारखा दिसतो. त्वचेच्या याच समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी महिला बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या स्किन केअर प्रॉडक्टचा आणि क्रीमचा वापर करतात.

सुरकुत्या- पिंपल्स कायमचे होतील गायब! आठवड्यातून दोनदा चेहऱ्यावर लावा जायफळाचा आयुर्वेदिक लेप
Face Pack: हिवाळ्यात त्वचेवर पांढरा थर तयार झाला आहे? मग 'या' फेसपॅकने काळवंडलेली त्वचा होईल चमकदार आणि स्मूथ

त्वचा उजळदार होण्यासाठी हजारो रुपये खर्च केले जातात. काहीवेळा महागड्या स्किन ट्रीटमेंट आणि क्रीम लावतात. पण याने फारसा परिणाम चेहऱ्यावर दिसून येत नाही. त्यामुळे त्वचेच्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी जायफळाचा लेप त्वचेवर लावावा. यामुळे चेहऱ्यावर आलेले काळे डाग, पिंपल्स आणि सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. जेवणातील विविध पदार्थ बनवताना जायफळाचा वापर केला जातो. यामुळे अन्नपदार्थ पचन होतात आणि पदार्थांची चव वाढते.

जायफळाचा लेप बनवण्याची कृती:

जायफळाचा लेप बनवण्यासाठी वाटीमध्ये जायफळ, दूध, हळद, कोरफड जेल, ज्येष्ठमध पावडर आणि चंदन पावडर घेऊन एकत्र करून व्यवस्थित मिक्स करा. तयार केलेले मिश्रण संपूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर लावून काहीवेळ तसेच ठेवा. काहीवेळ झाल्यानंतर हातांना पाणी लावून हलक्या हाताने मसाज करा. मसाज केल्यामुळे डेड नष्ट होण्यास मदत होते. चेहरा पूर्णपणे पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. फेसपॅक किंवा कोणताही लेप लावल्यानंतर त्वचा थंड पाण्याने धुवाव्यात. पण फेसपॅक लावण्याआधी पॅच टेस्ट करून पाहणे आवश्यक आहे.

सुरकुत्या- पिंपल्स कायमचे होतील गायब! आठवड्यातून दोनदा चेहऱ्यावर लावा जायफळाचा आयुर्वेदिक लेप
Health tips: कोकम वॅक्स म्हणजे काय? त्वचेच्या काळजीसाठी कसा होतो उपयोग? जाणून घ्या सविस्तर माहिती!

जायफळाचा वापर केल्यामुळे त्वचा आतून स्वच्छ होण्यास मदत होते. याशिवाय त्वचा मऊ होऊन चेहऱ्यावर वाढलेले काळे डाग कमी होतात. हळदीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट आणि शांत गुणधर्म डेड स्किन घालवण्यासोबतच त्वचा चमकदार करतात. त्वचेवरील नैसर्गिक चमक वाढवण्यासाठी आणि खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी जायफळाचा वापर करावा. उन्हाचा त्रास किंवा वाढत्या टॅनिंगमुळे त्वचा लाल झाली असेल तर चंदन लेप त्वचेवर लावावा.