

राज्यात आज विधानसभेकरिता मतदान पार पडत असताना 5 वाजेपर्यंत सुमारे 58.22 टक्के मतदान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक मतदान हे कोल्हापूर जिल्ह्यात झाले असून तेथे 67.97% झाले आहे. तर सर्वात कमी मतदान हे मुंबई शहरात झाले आहे. तेथे 49.07 % इतके मतदान झाले आहे.
•अहमदनगर: 61.95%
•अकोला: 56.16%
•अमरावती: 58.48%
•औरंगाबाद: 60.83%
•बीड: 60.62%
•भंडारा: 65.88%
•बुलढाणा: 62.84%
•चंद्रपुर: 64.48%
•धुले: 59.75%
•गडचिरोली: 69.63%
•गोंदिया: 65.09%
•हिंगोली: 61.18%
•जळगाव: 54.69%
•जालना: 64.17%
•कोल्हापुर: 67.97%
•लातूर: 61.43%
•मुंबई शहर: 49.07%
•मुंबई उपनगर: 51.76%
•नागपुर: 56.06%
•नांदेड़: 55.88%
•नंदुरबार: 63.72%
•नाशिक: 59.85%
•उस्मानाबाद: 58.59%
•पालघर: 59.31%
•परभणी: 62.73%
•पुणे: 54.09%
•रायगड: 61.01%
•रत्नागिरी: 60.35%
•सांगली: 63.28%
•सातारा: 64.16%
•सिंधुदुर्ग: 62.06%
•सोलापुर: 57.09%
•ठाणे: 49.76%
•वर्धा: 63.50%
•वाशिम: 57.42%
•यवतमाळ: 61.22%
महाराष्ट्रातील 288 विधानसभा जागांसाठी एकूण 4136 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यामध्ये 3771 पुरुष, 363 महिला आणि 2 तृतीयपंथी उमेदवारांचा समावेश आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी ईव्हीएमची व्यवस्था मोठ्या प्रमाणावर केली गेली आहे. राज्यभर 1 लाख 186 मुख्य मतदान केंद्रे आणि 241 सहायक मतदान केंद्रांची व्यवस्था केली आहे. एकूण 1 लाख 427 मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली असून, पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 8,462, मुंबई उपनगरात 7,579, ठाण्यात 6,955, नाशिकमध्ये 4,922, आणि नागपूरमध्ये 4,631 मतदान केंद्रे आहेत.
185 विधानसभा मतदारसंघांसाठी एक बॅलेट युनिट, 100 मतदारसंघांसाठी दोन बॅलेट युनिट्स, आणि तीन मतदारसंघांसाठी तीन बॅलेट युनिट्स लागणार आहेत. मतदान केंद्रांची संख्या वाढवण्यात आल्याने मतदारांना सुलभ मतदानाची प्रक्रिया मिळवण्यास मदत होईल. शहरी भागात 42,604 आणि ग्रामीण भागात 57,582 मतदान केंद्रे स्थापित केली आहेत. पुणे, मुंबई, ठाणे यासारख्या शहरांमध्ये 1,181 मतदान केंद्रे उभारली गेली आहेत.
आदिवासी आणि दुर्गम भागातील मतदारांसाठी गडचिरोली, गोंदिया, नंदुरबार, धुळे आणि अमरावती जिल्ह्यात मतदान केंद्रांची संख्या वाढवण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने 426 महिला नियंत्रित मतदान केंद्रे स्थापन केली आहेत.
2019,2022 राजकीय सत्तांतरे
2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने महाराष्ट्रात 161 जागा जिंकल्या होत्या. भाजपला 105, शिवसेनेला 56, काँग्रेसला 44, आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 54 जागा मिळाल्या होत्या. इतर छोट्या पक्षांना 29 जागा मिळाल्या, तर 13 जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले होते. पण मुख्यमंत्रीपदावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये मतभेद निर्माण झाले आणि सत्तास्थापनेच्या वेळी दोन्ही पक्षांची युती तुटली. भाजपकडे बहुमत नसल्याने, शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत युती करून सरकार स्थापन केले. 2022 मध्ये राज्यात मोठा राजकीय भुकंप झाला आणि शिंदे गटाने 40 हून जास्त आमदारांसहित भाजपसोबत सत्ता स्थापन केली. शिंदे गटाने शिवसेनेवर दावा केला. शिवसेना चिन्ह आणि पक्ष त्यांना मिळाले. निवडणूक आयोगाच्या निकालाविरुद्ध उद्धव ठाकरेंनी न्यायालयात दाद मागितली आहे. त्यानंतर 2023 मध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाने युती सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. अजित पवार गटाने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षावर दावा केला आणि ते पक्षाचे प्रमुख झाले.